





“शिक्षक परिषदचे प्रलंबित मागण्यासाठी ६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण, जि.प. प्रशासनाने घेतला धसका “

β⇔ “दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : सोमवार : दि. 23 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक, ता. 23 ( प्रतिनिधी : भागवत महाले ) :-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने ६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषण आंदोलना संदर्भात निवेदन नाशिक पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. त्यांनतर स्वतः पोलीस अधीक्षक आणि शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार, वासुदेव बोरसे जिल्हाध्यक्ष यांनी निवड श्रेणी त्वरित मंजुर करून कार्यवाही व्हावी, यासाठी आंदोलनास परवानगी मिळावी, म्हणून पत्राव्दारे माहिती देण्यात आली .
सदर प्रलंबित सुमारे २४ वर्षापासुन निवड श्रेणी प्रस्ताव हे त्वरित निवड श्रेणी यादी मंजूर होऊन प्रदर्शित व्हावी आणि संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाईची कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रप्रमुख पदोन्नती अंतिम यादी जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आमरण उपोषण आंदोलनावर ठाम आहे. अशी माहिती संजय बबनराव पगार संस्थापक कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी दिली आहे.
त्यांनतर स्वतंत्रपणे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, कोळी साहेब,ओ.एस.दराडे,संजय पगार, वासुदेव बोरसे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्याचे ,निफाड, कळवण, इगतपुरी प्रस्ताव येणे बाकी आहे , ते प्रस्ताव त्वरित बोलवून न आल्यास संबंधितांना कारवाईची नोटीस देण्यात येईल . असे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी संजय पगार यांना माहिती दिली. की निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर होऊन ३ नोव्हेंबर २०२३रोजी मंजुर यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर तुम्ही स्वतः येऊन खात्री करा. उपोषण करु नये आणि आंदोलन मागे घ्यावे,असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.परंतु आम्ही निवड श्रेणी मंजूर यादी प्रसिद्ध झाल्याखेरीज व अंतिम केंद्रप्रमुख पदोन्नती यादी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अन्यथा आंदोलन होणारच असे, संजय पगार संस्थापक कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सांगितले. यावेळी बहुसंख्येने शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
