





नाईक महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाची एक दिवशीय “सर्प जनजागृती कार्यशाळा” संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक (शहर), दि.19 (प्रतिनिधी : डॉ.धीरज झाल्टे):- येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्राणीशास्त्र विभाग अंतर्गत एक दिवसीय सर्प जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सर्प जनजागृती कार्यशाळानिमित्त पोस्टर प्रदर्शन, वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून वन्यजीव बचाव पथकातील मानद वन्यजीव अधीक्षक वैभव भोगले हे उपस्थित होते.
या कार्यशाळेप्रसंगी भोगले म्हणाले की, विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सापांच्या जाती, साप चावल्या नंतरचे प्रथमोपचार, सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा व वन्यजीव क्षेत्रातील करिअर संधी आदी माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी “सर्प जनजागृती कार्यशाळा ” विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्य डॉ. सानप यांनी विद्यार्थ्यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ कसा विकसित करावा व प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी कसे जागरूक राहावे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज गोस्वामी यांनी आपल्या प्रास्ताविक करतांना म्हणाले की, वन्य प्राण्यांविषयी समाजामध्ये जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. धनराज गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रेखा जाधव, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. रश्मी पिंगळे, प्रा. अपर्णा सोनवणे, प्रा. काजल ढाकणे, प्रा. प्रियंका सांगळे, प्रा. प्रशांत हाडपे, प्रा. अश्विनी वारुळे, लॅब अटेंडंट विलास कातकडे, संजय सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारोप प्रसंगी पोस्टर प्रदर्शन स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप कुटे, डॉ. पौर्णिमा बोडके, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. धीरज झाल्टे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नौकुडकर, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. पी. शिंदे, डॉ. सचिन शिंदे, आदीसह प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी पिंगळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी वारुळे यांनी केले. कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )