वयोवृद्ध, दुर्धर आजार, दिव्यांग,महिलांना निवडणूक कामातून वगळावे,निवडणूक आदेशासंदर्भात तहसीलदारांना शिक्षक परिषदेचे निवेदन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 7 फेब्रुवारी 2024
β⇔ दिंडोरी, दि.7 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वात पदाधिकारींनी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवडणूक आदेशासंदर्भात निवेदन देण्यात आले. प्रथमतः प्रविण देशमुख यांनी नव्याने रुजू झालेले तहसीलदार मुकेश कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आगामी लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकासाठी तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.तरी ५५ वर्षावरील , दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त , गरोदर महिला,स्तनदा माता यांना आदेश देण्यात येऊ नये व निवडणूक कामातुन वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, रविंद्र ह्याळिज,कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कार्याध्यक्ष रविंद्र भरसट, कोषाध्यक्ष नितिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक खैरनार, उपाध्यक्ष प्रविण दळवी/देशमुख, सल्लागार राहुल परदेशी,संघटन मंत्री राजेंद्र कापसे , कैलास बांगर,अरुण रोडे आदी उपस्थित होते.
“निवडणूक नियुक्त्या वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर महिला,स्तनदा माता यांच्या करण्यात आल्या असुन त्यांना निवडणुक वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे.कामातुन पुरावे सादर केल्यास त्यांना कामातुन निवडणूक कामातुन सवलत देण्यात येणार असे आश्वासन मिळाले.” – रावसाहेब जाधव ,तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा.वि.शाखा दिंडोरी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510