Breaking
ब्रेकिंग

β : नाशिक :⇒ प्रा. डॉ. भागवत महाले यांचे राज्यशास्त्र विभागाचे दुसरे पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित – ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

β : नाशिक :⇒ प्रा. डॉ. भागवत महाले यांचे राज्यशास्त्र विभागाचे दुसरे पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित - ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

0 0 2 5 6 1

प्रा. डॉ. भागवत महाले यांचे राज्यशास्त्र विभागाचे
दुसरे पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :  नाशिक :मंगळवार : दि . ५ सप्टेंबर २०२३ 

नाशिक, ता. ५   ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :-  मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांचे राज्यशास्त्र विषयाचे दुसरे पेटंट मंजूर झाले असून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी संशोधन करून विद्यार्थ्याना सामाजिक मुल्याबरोबरच स्वतःची बौद्धिक प्रगती योग्य दिशेने होण्याच्या दृष्टीकोनातून योग्य मार्गदर्शकाची भूमिका , नव – नवीन संशोधन कार्य करून समाजाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणून संशोधनातून विद्यार्थ्यांना स्वतःची बौद्धिक प्रगती योग्य दिशेने होण्यासाठी संशोधन दृष्टीकोन देवून प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच देशाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल असे प्रा डॉ भागवत महाले यांच्या संशोधनाचा उद्देश आहे , म्हणून सामाजिक शास्त्रातील राज्यशास्त्र विषयात “आऊटसोर्सिंग मानवी संसाधन कार्य आणि कार्य प्रदर्शन” या संशोधन विषयात प्रशासकीय आणि खासगी कार्यात मानवी स्रोत आणि कार्य कुशलता यांचे योग्य वापर होण्यास मदत होणार आहे.

                हे त्यांचे दुसरे प्रकाशित झालेले पेटंट आहे . तर प्रा. डॉ. भागवत महाले यांनी राज्यशास्त्र विभागाचे पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित करणारे पहिले संशोधक ठरले होते . त्यांनी “भारतीय राजकारातील भ्रष्टाचार आणि ते दूर करण्याचे मार्ग ” या विषयावर नाशिक जिल्हातील हे पहिलेच राज्यशास्त्र विभागाचे पेटंट भारतीय शासकीय जर्नल्समधून प्रकाशित झालेले आहे. प्रा. भागवत शंकर महाले यांच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे , संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुनील ढिकले व पदाधिकारी , शिक्षणाधिकारी व त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, आदींसह महाविद्यायातील शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो ८२०८१८०५१०

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 1

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!