





येडशीत वारंवार विद्युत पुरवठा खंडित, नागरिकांची महावितरणकडे तक्रार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 29 सप्टेंबर 2024
β⇔येडशी,दि,29(प्रतिनिधी : सुभान शेख):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मागील काही महिन्यांपासून महावितरणकडून दररोज विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. कधी रात्री-अपरात्री, कधी सकाळी, तर कधी दुपारी किंवा संध्याकाळी, तसेच काहीवेळा दिवसभरच विद्युत पुरवठा खंडित असतो. नागरिक किंवा येडशीतील प्रतिनिधी महावितरण कार्यालयात तक्रार करताच, नेहमीच मिळणारे उत्तर असे असते की, धाराशिवहून येणारा थ्री-फेज सप्लाय बंद आहे, विद्युत पोलवरील तार तुटली आहे, या सारख्या कारणांनी येडशीतील नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरीही सहाय्यक अभियंता पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही याकडे लक्ष देत नाही.
महावितरणला प्रत्येक महिन्याला विद्युत बिले द्यायची मात्र चोख माहिती आहे, पण येडशीतील नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा होतो का? याकडे कोणी लक्ष देत नाही. येडशीमध्ये विद्युत चोरी होते का, हे तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः येडशी महावितरण कार्यालयाला भेट देऊन याबाबत तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येडशीतील लोकसंख्या आणि घरांमध्ये बसवलेले विद्युत मीटर याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरवर्षी किमान चार वेळा तरी येडशी महावितरण कार्यालयाला भेट देऊन येथील विद्युत पुरवठ्याची स्थिती तपासावी. काही दिवसांपासून येडशीतील गावठाण भागातील विद्युत केबल ओढण्याचे काम ठप्प झाले आहे, यामागे नेमके कोणते कारण आहे, याची चौकशी करावी. येडशीतील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )