





” पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत “- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार
β : कळवण : ” पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाही “- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार – ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. २८ सप्टेंबर २०२३
β⇒ कळवण , ता. २७ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकारिता आहे, म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांनी केले. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने कळवण येथे आयोजित आदर्श सन्मान, पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला , त्याप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात बोलताना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम म्हणाले, की राज्यात पत्रकारांना शासनाच्यावतीने दिला जाणारा लाभ फक्त अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिला जात असल्याने प्रत्यक्ष तळागाळात काम करणारा पत्रकार सुविधेपासून वंचित राहिला आहे . त्यामुळे अधिस्वीकृतीची जाचक अट रद्द करून नोंदणीकृत सर्व मीडिया प्रतिनिधींना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांच्याकडे केली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, तहसीलदार -रोहिदास वारुळे कळवण, वनपरिक्षेत्र अधिकारी- गायकवाड मॅडम, कळवणचे नगराध्यक्ष- कौतिक पगार, प्रदेश संपर्क प्रमुख- प्रफुल्ल मेश्राम, संतोष अहिरे, सोमनाथ मानकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे , जिल्हाध्यक्ष- संतोष सोनावणे योगेश घोलप, उत्तर महाराष्ट्र उपसचिव -राहुल वैराळ, प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे प्रदेश अध्यक्ष- प्रकाश गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, येवला, निफाड, कळवण, दिंडोरी,पेठ, सुरगाणा अशा अनेक जिल्ह्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील आदर्श शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, व गुणवंत विद्यार्थी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी, मदतनीस, प्रगतशील शेतकरी यांना राज्यस्तरीय आदर्श भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाभरांतील पत्रकार उपस्थित होते.त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
