“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संदीप फाऊंडेशनचे प्रमुख ध्येय”– प्राचार्य डॉ. बोरसे
संदीप फाऊंडेशन संचालित फार्मसी महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळावा संपन्न…
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : महिरवणी प्रतिनिधी : डॉ कमलेश दंडगव्हाळ
β⇒ महिरावनी ( नाशिक ) , ता . ११ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :– येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता पदविका, पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते. प्रा. डॉ साईनाथ आहेर यांनी सभेची प्रस्तावना , सादरीकरण करून महाविद्यालयाची माहिती दिली. प्राध्यापक व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी पालकांशी चर्चा केली. उपस्थित पालकांनी मुलाच्या शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत प्रशंसनीय आहे, असेही पालकांनी सांगितले. प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे यांनी शिक्षक-पालक मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात मूल्यवर्धित कार्यक्रम (व्हॅल्यू अएडेड प्रोग्रॅम) व कौशल्य विकास (सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट) हे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले आणि आवश्यक अश्या मार्गदर्शक सूचना केल्या. प्रा. डॉ. सारिका कांबळे यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की , संदीप फाऊंडेशनमध्ये इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर मार्फत संशोधनाला चालना देण्यात येत आहे. त्याअंतर्गत विद्यार्थाना स्टार्टप करता मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मोबाईल . ८२०८१८०५१०