





येडशी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि11 एप्रिल 2024
β⇔येडशी– दि.11(प्रतिनिधी : सुभान शेख) :- तालुक्यातील येडशी येथे उस्मानाबाद-धाराशिव ग्रामीण नुतन पोलिस निरीक्षक-मारुती शेळके यांनी आज दि.11 एप्रिल 2024 गुरुवार रोजी रमजान ईद निमित्ताने सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर जुने रोड, लगट असलेले इदगाह वरील मुस्लिम बांधवांना ईद ऊल फित्रची नमाज पठण करण्यासाठी पोलिस निरीक्षक-माहिती शेळके यांनी पुर्णपणे बंदोबस्ताचा पहारा देण्यात आला. जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष-जब्बार पटेल यांच्या उपस्थितीखाली मौल्लवी-अमजद पटेल यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद ऊल फित्र ची नमाज सकाळी अंदाजे वेळ ठीक 10 : 00 वाजता नमाज पठण करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेले उप अध्यक्ष-अशफाक पटेल, सदस्य-सल्लाऊदिन शेख, समीर कोतवाल, आखिल नजिर शेख, महामुद पटेल, गावातील-उस्मानाबाद पंचायत समिती माजी सभापती-अकबर तांबोळी, दस्तगीर शेख, हैदर पटेल, उस्मान पटेल, खालिद शेख, सुभान शेख, आमिर शेख, रफिक पटेल, जमीर पटेल, निसार पटेल, या इदगाह वरील उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत असलेले – औट पोस्ट पोलिस ठाणेचे-अविनाश शिंदे, गंगाधर मुळखेडे, साखरे, आदि सर्व पोलिस प्रशासनानी उपस्थिती दाखवून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, या रमजान ईद दिवशी ईदगाह वरील नमाज पठण करत असताना अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर जुने रोड वरील जनता विद्यालय समोर, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती-संजय(काका ) लोखंडे यांचे मित्र मंडळ या सर्वांनी मुस्लिम बांधवांना सर्वांच्या हातामध्ये गुलाब गुच्छ देऊन गळ्यातील गाठी-भेटी देऊन,रमजान ईदच्या, शुभेच्छा देण्यात आल्या.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510