समाज आणि स्वतःच्या विकासासाठी संशोधन आवश्यक – संकेत कदम
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 13 मार्च 2024
β⇔नाशिक रोड, दि,13(प्रतिनिधी:संजय परमसागर):गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन, आय. क्यू. ए. सी. आणि मराठी विज्ञान परिषद नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी ‘संशोधनाकडे वळा’ या संकल्पनेवर आधारित इन्स्टिटय़ूट ऑफ़ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई येथील ज्युनिअर रिसर्च फेलो संकेत कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संकेत कदम यांनी आदिम काळात ते आधुनिक काळात मानवाला लागलेल्या शोधांच्या साखळीतील टप्पे जसे अग्नी, चाक, लिहिणे, कागद, गण पावडर, विद्युत दिवा, मोटर, विमान, संगणक इत्यादी शोधांचा उल्लेख केला. यावरच संशोधन न थांबता मानवाने याही पुढे जावून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संशोधनाची परंपरा चालूच ठेवली आहे. संशोधन हे का, कसे, कुठे, कधी, कुणी, केव्हा या प्रश्नांच्या उत्तरासाठी करावे लागते की ज्यायोगे समाजाचा आणि स्वतःचा देखील विकास साधला जाईल. जागतिक जीडीपी यादी नुसार भारताचा क्रमांक १४० वा असून वरच्या स्थानी येण्यासाठी संशोधन क्षेत्राकडे विद्यार्थ्यानी वळावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अखेरीस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी मराठी विज्ञान परिषदेबद्दलची माहिती नाशिक शाखेचे पदाधिकारी गणेश बागुल यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ दीपक बोरस्ते, आभारप्रदर्शन प्रा. डॉ. किशोरी धुमाळ आणि सूत्रसंचालन प्रा डॉ दीपक बोरस्ते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आकाश ठाकूर, सायन्स शाखेचे समन्वयक प्रा डॉ कल्याण टकले, प्रा. डॉ. हेमंत भट, प्रा. डॉ. कैलास बोरसे तसेच प्रा. डॉ. राजश्री नाईक, प्रा. डॉ. अश्विनी घनबहाद्दूर, प्रा. डॉ. दिलीप शिंपी, प्रा. डॉ. दीपक टोपे, प्रा. माधुरी हंडोरे, प्रा. संदीप पिंगळे, प्रा.ज्योती पेखळे, प्रा. धनश्री बोडके, प्रा. श्रुती वांद्रा, प्रा. ऐश्वर्या बर्डे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510