





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत ज्ञान, विज्ञान, वाचन चळवळ व्याख्यानमाला संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 फेब्रुवारी 2024
β⇔त्र्यंबकेश्वर,दि.20 (प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे):-येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्र्यंबकेश्वर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा महाविद्यालय व्याख्यामालेच्या बहिःशाल अंतर्गत तीन दिवसीय ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतरही विषयाचे सखोल ज्ञान व्हावे, हा आयोजनाचा उद्देश असल्याचे म्हटले.या कार्यक्रमाचे प्रथम पुष्प माजी प्राचार्य डॉ. के . एम. मोरे यांनी गुंफले. ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकांवर त्यांनी भाष्य केले. हे सांगत असताना त्यांनी बहिणाबाई चौधरी यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या कवितांचे पठण व विश्लेषण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे साहित्य हे त्यांच्या संघर्ष व अनुभवातून आलेले असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प डॉ.सायली आचार्य यांनी गुंफले. आचार्य यांनी ‘बाईमाणूस’ या पुस्तकाचे विमोचन करत असताना स्त्री स्वातंत्र्य व त्यासंबंधीत बाबींवरती प्रकाश टाकत, खरं स्त्री स्वातंत्र्य आहार- विहार स्वातंत्र्य नसून वैचारिक निर्णयाचे स्वातंत्र्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प डॉ.दिपा कुचेकर यांनी गुंफले, त्यांनी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यकार मोहन राकेश लिखित ‘आधे अधुरे’ या नाटकावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सदर नाटकातील महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे आयोजन बहि:शाल समन्वयक डाॅ.मनिषा पाटील यांनी केले. डॉ. मनीषा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकाळसत्र डाॅ.राजेश झनकर, डॉ. विठ्ठल सोनवणे, प्रा.समाधान गांगुर्डे, डॉ.भागवत महाले, प्रा.उत्तम सांगळे, प्रा. संदीप गोसावी, प्रा.प्रशांत रणसुरे, डॉ. संदीप निकम, डॉ. सुलक्षणा कोळी, प्रा.शाश्वती निरभवणे, डॉ.अजित नगरकर, डॉ.नीता पुणतांबेकर, प्रा. मनोहर जोपळे, प्रा.आशुतोष खाडे,प्रा.अर्चना धारराव , डाॅ.जया शिंदे डाॅ.पोपट बिरारी, प्रा.विष्णू दिघे, डॉ.नयना पाटील, सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. ही व्याख्यानमाला मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510