————————————————————————–
सायखेडा विद्यालयाचा एसएससी बोर्डाचा निकाल ९४.४०%
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : DIVYA BHARAT BSM NEWS : NASHIK,JUNE 2, 2023
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज – निफाड प्रतिनिधी : राजेंद्र कदम
———————————————————————————————–
निफाड ,ता. २ ( दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज ) : सायखेडा (ता.निफाड ) येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च २०२३ चा निकाल आज जाहीर झाला असून त्यात विद्यालयाचा निकाल ९४.४०% लागला आहे . सदर परीक्षेला १४३ विद्यार्थी बसलेले होते . त्यापैकी १३५ विद्यार्थी पास झाले आहे. त्यापैकी डिस्टिंक्शन ४३ विद्यार्थी , प्रथम श्रेणी ५० विद्यार्थी , द्वितीय श्रेणी ३६ विद्यार्थी ,पास श्रेणी ६ विद्यार्थी, उत्तीर्ण झाले आहे .प्रथम क्रमांक कु.दिव्या नितीन निकम ९१.६०%. द्वितीय क्रमांक कु. खुशी बबन कमानकर ९१.००% तृतीय क्रमांक कु. प्राजक्ता रवी राजोळे ८९.४०% . चतुर्थ क्रमांक कु. अथर्व गोरख कांडेकर ८८.४०% . पाचवा क्रमांक कु. अस्मिता वसंत जोशी ८७.८०% या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
वरिल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन भाऊ ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष श्री.विश्वासराव मोरे,सभापती श्री.बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी.बी.आण्णा मोगल,चिटणीस दिलीप दळवी,निफाड तालुका संचालक शिवाजी पा.गडाख, माध्यमिक स्कूल कमेटी अध्यक्ष, विजयजी कारे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष कमलाकांताचार्य महाराज, प्राचार्य नवनाथ निकम, सदस्य नितीन भाऊ गावले,अभिनव शालेय समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील डेर्ले, सरपंच गणेश कातकाडे,सर्व शालेय समिती सदस्य ,उपमुख्याध्यापक रमेश अडसरे,पर्यवेक्षक दौलत शिंदे, जगन आप्पा कुटे,पंडितराव सांगळे सर,संजय कांडेकर, सुभाष कारे,अविनाश सुकेनकर, भाऊसाहेब सुकेनकर, कृष्णा आघाव, भाऊसाहेब कातकाडे,राजेंद्र कुटे,घनश्याम जोंधळे पालक संघ सर्व पालक,ग्रामस्थ , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आदीनी अभिनंदन केले.
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : DIVYA BHARAT BSM NEWS : NASHIK,JUNE 2, 2023
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले , मोब .नं. ८२०८१८०५१०
———————————————————————————————–
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा