





स्वाइन फ्लूची लागण झाल्याने सिन्नर तालुक्यात महिलेचा मृत्यू

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 16 एप्रिल 2024
β⇔ सिन्नर (नाशिक), दि.16 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-सिन्नर तालुक्यातील दातली येथील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली असून शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोकेवर काढले असून दोघांना लागण झाल्याचे लक्षात येताच सिन्नर नगरपरिषदची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सद्या स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. तसेच सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या वर्षी शहरात डेंगूणे थैमान घातले होते आणि आता स्वाइन फ्लूने डोकेवर काढले असून शहरवासीयांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरांमध्ये दोन रुग्णांचा अहवाल आले आहेत. त्यात एका महिलेचा व एका पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले असता. त्या दोघांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग आता सतर्क झाली आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांचे स्वाब घेण्यात आले आहेत. सिन्नर येथील दातली गावातील 63 वर्षीय महिला शहरातील खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वाइन फ्लूचे लक्षणे दिसताच रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी सिन्नर यांनी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510