





सकल मराठा समाजाकडून येडशीत आरक्षणाचा जल्लोष

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 29 जानेवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.29( प्रतिनिधी : सुभान शेख ):-संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले.नोंदी सापडलेल्या सगेसोयर्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यभर सकल मराठा बांधवांकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. धाराशिव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी गुलालाची उधळण करीत , हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे झेंडे घेऊन , संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा हातामध्ये घेऊन , मोठमोठ्याने घोषणा देण्यात आली. यामुळे मराठा आरक्षण विजय साजरा केल्याचे या छायाचित्रात दिसत आहे.
सकल मराठा समाज बांधवांनीजल्लोष करत असताना , सहभागी होऊन, जबाबदारी ने काळजी घेऊन , सहभागी असलेले – धैर्यशील सस्ते , विजयकुमार सस्ते , श्रीमंत नवले , जयंतराजे भोसले , संजय लोखंडे , शंकर मोहिते , अमोल कवडे , अक्षय खोबरे , विनोद पवार , किशोर पवार , बाळासाहेब पवार आदि सर्व सकल मराठा समाज बांधव या आरक्षणाच्या जल्लोषात सहभागी झाले होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510