





संदिप फाउंडेशन रासेयो स्वयंसेवकच्या समुपदेशनाने गणेश मूर्तीदान, ‘गणेश मूर्ती’ आणि ‘निर्माल्य’ यांचे संकलन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 20 सप्टेंबर 2024
β⇔महिरावणी (नाशिक),दि.20 (प्रतिनिधी : प्रा डॉ कमलेश दंडगव्हाळ ) :-संदिप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच नाशिक महानगरपालिका, स्वप्नपूर्ती फौंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने दि. १७ सप्टेंबर रोजी ‘रामकुंड पंचवटी’ येथे ‘गणेश मूर्ती’ आणि ‘निर्माल्य’ यांचे संकलन करण्यात आले. गणपती बाप्पाचे दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात येतो. गणपती बाप्पाच्या मूर्तीचे नुकसान, विटंबना आणि पर्यावरणाची हानी होऊ नये, हा या मागील मुख्य उद्देश होता. रासेयो स्वयंसेवक यांनी आलेल्या भाविकांचे समुपदेशन करून त्यांना गणेश मूर्ती दान करण्यास प्रोत्साहित केले व स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात आणून गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण आपण कसे रोखू शकतो, याचे महत्व अधोरेखित केले.
सदर मूर्ती आणि निर्माल्य संकलन उपक्रमात प्राचार्य डॉ. बोरसे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. शंकर येलमामे यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थी प्रतिनिधी ऋषिकेश हिरे, वैष्णवी धामणे, अश्विनी तनपुरे, पल्लवी जाधव, मानसी पाटील, निकिता कदम, साक्षी पावसे, सोहंम जोशी, प्रांजल पाटील यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातर्फे पर्यावरण संवर्धनाची उपक्रमे नेहमीच राबविले जातात अशी माहिती प्राचार्य डॉ. बोरसे यांनी दिली. संदीप फार्मसी महाविद्यालयाला नुकतेच नॅक तर्फे A+ ही सर्वोच्य श्रेणी मिळाली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )