शासनाची एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनाची घोषणा फसवी , शेतकरी वर्गात संभ्रम ,त्वरित कार्यवाहीची मागणी
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :सोमवार : दि.20 नोव्हेंबर 2023
β⇔येडशी (जि.धाराशिव), ता.20 (प्रतिनिधी : सुभान शेख ) :- महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२५-२६ या वर्षासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतमधून रब्बी हंगामासाठी ग्रामपंचायतील संगणकमध्ये एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केली होती . त्यानुसार पिक विमा पॉलिसी भरण्यासाठी शासनाने शेतकरी बांधवांना आश्वासन दिले होते . परंतु अनेक गावाच्या ग्रामपंचायतीमधून संगणक कक्षामध्ये एक रुपयात पिक विमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जात नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडला आहे. शासन निर्देशानुसार रब्बी हंगामातील ज्वारी पीक विमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर व हरभरा पिक विमा १५ डिसेंबर 2023 पर्यंत शासनाने घोषित केले आहे.परंतु या शेतकऱ्यांना सीएसी ऑनलाईन दुकानात जाऊन , पिक विमा भरण्यासाठी १०० रुपये पासुन ते २५० रुपयेपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. ही पिक विमा योजना शासनाकडुन घोषणा फसवी ठरत असल्याचे दिसून येत आहे.या संदर्भात माहिती अशी की , या शेतकऱ्यांचे पिक विमा ग्रामपंचायतीने संगणकमध्ये एक रुपयात भरून घेतले पाहिजे.परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण व खेडे – पाड्यातील ग्रामपंचायतमध्ये संगणक असतांना पिक विमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतली जात नाही.तसेच महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांना एक रुपयात पिक विमा भरून घेण्यासाठी आदेश देण्यात यावेत आणि जर एक रुपयात पिक विमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले नाही तर , यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे. अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे . तसेच शेतकऱ्यांची सीएससी ऑनलाईन दुकानातली लुट होत असलेली शासनाने थांबवावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते – प्रकाश सोनार यांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०