





येडशी येथील घाणीचे साम्राज्य ”दिव्य भारत न्यूजची” बातमी प्रसारित होताच, ग्रामपंचायतीकडून दखल घेत स्वच्छता, दिव्य भारत वृत्ताचा दणका

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक :सोमवार : दि ४ डिसेंबर 2023
β⇔ येडशी ( धाराशिव ), ता.3 ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- येडशी (ता. धाराशिव ) येथील सुभाष नगर भागातील बलवंड गल्लीतील लहान बालके शिक्षण घेत असलेल्या अंगणवाडी क्रमांक 18 समोर अतिशय दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. त्यामुळे अंगणवाडी शाळेतील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले होते. मागील अनेक दिवसांपासून पहाटेच्या सुमारास महिलांकडून आपल्याच परिसरात ओला, कोरडा कचरा व प्लास्टिक टाकून घाण पसरवली जात होती, मात्र याकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. सदर बातमी ‘दिव्य भारत बीएसएम’ न्यूजची परसारीत होताच येडशी ग्रामपंचायत महिला सरपंच – डॉ. सोनिया प्रशांत पवार यांचे पती ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत हरिश्चंद्र पवार या दोघांनी अंगणवाडीकडे ताबडतोब दखल घेऊन काल दि.3 डिसेंबर 2023 रोजी ग्रामपंचायतकडुन अंगणवाडी समोरील अस्वच्च्छाता व घाणीचे साम्राज्य असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला आहे . त्यामुळे सदर परिसर स्वच्छ सुंदर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे . मात्र ग्रामपंचायत सरपंच यांनी दखल घेत वेळीच हा प्रश्न मार्गी लावला आहे, असे सर्व प्रश्न वेळेत सोडवले जावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे .

सदर कचरा व घाणीचे साम्राज्य प्रश्नी अंगणवाडीच्या आशा सेविका – टापरे मॅडम यांनी सतत विनंती अर्ज ग्रामपंचायतीकडे केले होते. परंतु ग्रामपंचायतीकडून या विनंती अर्जाची दखल घेतली जात नव्हती .त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते. लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही बाब गंभीर असून या प्रश्नी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे येडशी दिव्य भारत प्रतिनिधी सुभान शेख यांनी नाशिक येथील दैनिक दिव्य भारत बीएसएम न्यूजला सदर बातमी दिली. दि.23 नोव्हेंबर रोजी दिव्य भारतला “येडशीत अंगणवाडीसमोर घाणीचे साम्राज्य,लहान बालकांचा जीव धोक्यात, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष” अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. सदर बातमी दिव्य भारत बी एस एम न्यूजला प्रकाशित पडताच , येडशी ग्रामपंचायत महिला सरपंच – डॉ. सोनिया प्रशांत पवार यांचे पती ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत हरिश्चंद्र पवार या दोघांनी अंगणवाडीकडे ताबडतोब चौकशी करून वृत्ताची दखल घेऊन काल दि.3 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कडुन अंगणवाडी समोरील घाणीचे साम्राज्य हटविण्यात आले, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. ग्रामस्थांकडून दिव्य भारत बीएसएम न्यूजचा दणका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिक व ग्रामस्थांकडून अंगणवाडीच्या आशा सेविका, संपादक डॉ.भागवत महाले , येडशी प्रतिनिधी सुभान शेख , ग्रामपंचायत सरपंच – डॉ. सोनिया प्रशांत पवार , सदस्य या सर्वांचे कौतुक करून आभार मानले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ. भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
