दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : १ मे २०२६

आंबेडकर जयंतीनिमित्त ‘माझी आत्मकथा’ पुस्तकाचे वाटप,बारडमध्ये उत्साहात जयंती साजरी; समता सैनिक दलाची वंदना
मुदखेड, (नांदेड ) (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बारड येथील ज्ञानदीप नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी भिम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रा. संदीपकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित ‘माझी आत्मकथा’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व संघर्षाची प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमांची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास सामूहिक पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदनाने झाली. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स.पो.नि. दत्तात्रेय मंठाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पार पडले. समता सैनिक दलाच्या वतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी सरपंच दिलीपराव कोरे, अँड कमलेश चौदंते, निलेशराव देशमुख, उत्तमराव लोमटे, प्रतापराव देशमुख, प्रा. संदीपकुमार देशमुख, विजय देशमुख, महेश देशमुख, प्रभाकर आठवले, नरसिंग आठवले, नरहरी आठवले, राहुल आठवले, धोंडीबा आठवले, संजय मुलंगे, विजय देशमुख, पिराजी गाडेकर, अमोल टेकले, संजय सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र आठवले, उपाध्यक्ष अमोल आठवले, निशांत पाईकराव, बाळासाहेब आठवले व राजरत्न धुतडे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अँड. कमलेश चौदंते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज अधिक गरज असल्याचे नमूद करत देशात संविधान संपुष्टात येत असल्याची चिंता व्यक्त केली. यानंतर गावांतील प्रमुख रस्त्यांवरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी यावेळी समता सैनिक दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘माझी आत्मकथा’ या जीवनचरित्रातून त्यांच्या विचारांचा व संघर्षाचा परिचय व्हावा, या उद्देशाने प्रा. संदीपकुमार देशमुख यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांच्या वाचनातून आदर्श विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : शुक्रवार : दिनांक : १ मे २०२६

