केशवराव पाटील इंस्टिट्युट ऑफ़ फार्मसी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.4 जानेवारी 2024
β⇔येडशी, ता. 4 ( प्रतिनिधी : सुभान शेख ):-केशवराव पाटील इंस्टिट्युट ऑफ़ फार्मसी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास सुरवसे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करून करण्यात आली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली, भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणी कवयित्री होत्या. त्यांना भारतीय शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भुमिका बजावली व आमच्या विद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी मुस्कान आल्ताफ सय्यद या विद्यार्थीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल विचार मांडले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती ठेवलेल्या वक्तृत्व स्पर्धेत हिने प्रथम क्रमांक मिळवला. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. उल्हास सुरवसे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ. भागवत महाले : मो.८२०८१८०५१०