





वणी येथे महिला व बाल विकास विभागाचे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरु

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 27 डिसेंबर 2024
β⇔वणी (नाशिक),ता.27 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):–वणी (प्रतिनिधी): महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी आणि मुलींसाठी व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून वणी येथील अंगणवाडी केंद्रात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी इंफोकार्म कंप्यूटर इन्स्टिट्यूट, नाशिक आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, दिंडोरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वणी येथील 11 राजवाडा अंगणवाडी केंद्रात या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रशिक्षणाचा हेतू: महिलांना व मुलींना तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये प्रदान करणे, जेणेकरून त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत मिळेल. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सौ. उज्वला धूम व अनिता बागुल, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. प्रतिभा वाळके व सुनिता पाचपांडे, तसेच अंगणवाडी सेविका सौ. नंदाताई गांगुर्डे, अरूणा दुसाने, हुसैना शेख, सुनिता सोनवणे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षक सौ. शीतल पाचपांडे यांनी महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाचे महत्त्व आणि कौशल्य शिकवण्यावर भर दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे विचार व्यक्त करतांना सौ. प्रतिभा वाळके: “या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी आणि मुलींनी लाभ घ्यावा. आर्थिक स्वावलंबनासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.” सौ. सुनिता पाचपांडे: “अशा मोफत प्रशिक्षण उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा. अशा योजना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त आहेत.”सर्वांसाठी एक आवाहन:महिला व बाल विकास विभागाने चालवलेल्या या योजनेत सहभाग घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे महिलांना तांत्रिक कौशल्य मिळवून आपल्या जीवनात बदल घडवता येईल.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )