β : नागपूर : ⇔ खासदार महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य,कला, क्रिडा व संस्कृतीचा महासंगम -( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
β : नागपूर : ⇔ खासदार महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य,कला, क्रिडा व संस्कृतीचा महासंगम -( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
खासदार महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य,कला, क्रिडा व संस्कृतीचा महासंगम
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : शुक्रवार : दि. 2 डिसेंबर 2023
β⇔नागपूर, ता. 2 ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार ) :- नागपूरमध्ये खासदार महोत्सवाची सुरुवात 2018 पासून झाली.त्यानिमित्याने दरवर्षी नागपूरमध्ये खासदार महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो.त्याचप्रमाणे याही वर्षी दिनांक 24 नोव्हेंबर पासून खासदार महोत्सवाला सुरुवात झाली व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाच्या संस्कृतीचे दर्शन दिनांक 5 डिसेंबरपर्यत सर्वांनाच पहायला मिळेल. यापध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी नागरिकांसाठी आयोजित केलेले आहेत याकरिता त्यांचें मनापासून स्वागतच.याकार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यात मुख्यत्वे करून महाराष्ट्रासह भारतीय संस्कृतीचा वारसा पथनाट्याच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवील्या जातो.या कार्यक्रमात मुख्यत्वेकरून संपूर्ण धर्माची जोपासना आपण कशी टीकवायची याचेही हुबेहूब चित्रिकरण पहायला मिळते.सध्या सुरू असलेल्या खासदार महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राचा वारसा दिसून येईल.नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची चालना देण्याचे काम माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार महोत्सवाच्या निमित्ताने आतापर्यंत दाखविले आहे.पुढेही आपली संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने याहीवर्षीही आपल्याला खासदार महोत्सव पहायला मिळत आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारतातील अनेक राज्यांमध्ये सांस्कृतिक वारसा लुप्त होतांना दिसत आहे.परंतु विदर्भासह महाराष्ट्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सारखा पूत्र मिळाल्याने खासदार महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक वारसा जिवित झाल्याचे दिसून येते.भाजपा सत्तेत असो वा नसो नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम,कला, साहित्य, क्रिडा,सामाजिक उपक्रमांमध्ये खंबीरपणे भूमिका बजावुन आपले योगदान देत असतात.आज गडकरींच्या पुण्याईने नागपूरसह संपूर्ण भारतात उड्डाण पुलांचा बोलबाला दिसून येतो.नागपूरच्या विकासाची गोष्ट केली तर आज नागपुरचा संपूर्ण कायापालट झाल्याचे दिसून येते.हीबाब संपूर्ण देश अनुभवत आहे.नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण व केंद्रबिंदू आहे.आपातकालीन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूरची निवड केली जाते.त्या अनुषंगानेच नागपूरचा विकास होत असावा. विदर्भाला संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते.
संत, थोर महात्म्यांच्या आचार विचारांची जपणूक हीच खरी संस्कृती होय.आज आपली संस्कृती काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे.परंतु गडकरींच्या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृती जोपासण्याचे कार्य होत असल्याचे दिसून येते.आजच्या पिढीला मोबाईलमुळे व सोशल मीडियामुळे आपल्या संस्कृतीचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे.परंतु नवीन पिढीला सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती किंवा देशाची संस्कृतीचे जतन कसे करावे याची माहिती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. खासदार महोत्सवाच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीला जिथे-कुठे खिंडार पडले असेल.त्याला दुरुस्त करण्याचा विडा गडकरींनी घेतल्याचे दिसून येते.1947 नंतर नागपूरमध्ये अनेक खासदार होवून गेले.परंतु गडकरींचा काळ हा वाखाणण्याजोगा आहे.कारण खरोखरच महाराष्ट्राचा व देशाच्या विकास मार्ग मोकळा करणारा आणि सांस्कृतिक वारसा टिकविणारा हा काळ असल्याचे दिसून येते.ज्या दिवसापासुन गडकरीजी खासदार झाले तेव्हा पासून त्यांचा कामाचा सपाटा जोरदार सुरू आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चर्चा भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे ही नागपूरकरांसाठी,महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.गडकरींनी विकासाची सुरूवात उड्डाण पूलापासुन केली ती आज विकासाच्या शिखरापर्यंत जाणवु ठेपली आहे आणि आता विकासासोबतच सांस्कृतीची जोपासना करण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारल्याचे दिसून येते.यासाठी त्यांनी आपली ताकद पुर्णपणाला लावली आहे.भारतात अनेक ठिकाणी आपल्याला जातीय दंगली दिसून येतात.परंतु नागपूरमध्ये कोणतीच जातीय दंगल अथवा टोकाचे मतभेद व वाद झाल्याचे दिसून येत नाही.
नागपूरमध्ये संघ कार्यालय, दीक्षाभूमी,ताजबाग,गणेश टेकडी,चर्च इत्यादी नामांकित अनेक धार्मिक पुरातन स्थळे आहेत.त्याचे जतन सर्वधर्मीय करतात.गडकरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांना घेऊन चालने व समाजामध्ये सर्वच धर्माविषयी आदराची भावना निर्माण करून सर्वांना एकसुत्रीत बांधून ठेवण्याचे महत्वाचे काम गडकरींनी केले आणि करीत आहेत.खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून समाज कार्यासह लोकांनी आपल्या संस्कृतीचे जतन कसे करता येईल याची जाणीव करून देण्याचे कार्य गडकरी करीत आहे. नागपुरला राजकीय दृष्ट्या संघभुमि म्हणून भारतासह जगभर ओळखले जाते.परंतु आजही नागपूरमधील हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाइ-बौध्द एकोप्याने राहतात.ही नागपूरसाठी,नागपूरकरांसाठी व देशासाठी सन्मानाची बाब आहे.गडकरी नागपूरचे खासदार झाले म्हणूनच विकास झाला आणि त्यांच्यामुळेच संस्कृतीचे जतन कसे करावे याची शिकवण खासदार महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना मिळत आहे.आज गडकरींच्या कामाची शैली व एकाग्रता लक्षात घेता ते भारतासाठी “विकासपुरुष”आहेत.खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पुनर्जीवीत करण्याचे काम श्री गडकरीजी करीत आहे.खासदार महोत्सवामध्ये कला, संस्कृती, साहित्य, क्रिडा, यासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे दर्शन सुध्दा होते.श्री नितिनजी गडकरी यांच्या उपक्रमांना माझा सलाम.देशाची संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर देशातील संपूर्ण राज्यांच्या खासदारांनी दरवर्षी एकदातरी सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम आपापल्या क्षेत्रात घ्यायला हवा.यामुळे देशांच्या संस्कृतीची जोपासना होईल.जय हिंद!
लेखक :-
रमेश कृष्णराव लांजेवार. (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :मो ८२०८१८०५१०