β : नाशिक : ⇒ “विद्यार्थिनींनी ‘ पब्लिक स्पीकिंग’ करियरसाठी अभ्यास करून बोलावे “- प्रसिद्ध रेडिओ जॉकी : भूषण मटकरी – ( प्रतिनिधी : छाया लोखंडे )
β : नाशिक :⇒ " महिला महाविद्यालयाच्या करियर काउन्सिल सेलतर्फे विद्यार्थिनींसाठी ' पब्लिक स्पीकिंग' कार्यशाळा संपन्न ! " ( प्रतिनिधी : छाया लोखंडे )
“ विद्यार्थिनींनी ‘ पब्लिक स्पीकिंग’ करियरसाठी अभ्यास करून बोलावे “ – प्रसिद्ध रेडिओ जॉकी : भूषण मटकरी
” महिला महाविद्यालयाच्या करियर काउन्सिल सेलतर्फे विद्यार्थिनींसाठी ‘ पब्लिक स्पीकिंग’ कार्यशाळा संपन्न ! “
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि . 21 , ऑगस्ट 2023
⇒ नाशिक, ता . 21 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :- गोखले एज्युकेशन संस्थेच्या एस.एम.आर.के. बी.के.ए.के. महिला महाविद्यालयाच्या करियर काउन्सिल सेल तर्फे विद्यार्थिनींसाठी ‘ पब्लिक स्पीकिंग’ या विषयावर प्रसिद्ध रेडिओ जॉकी भूषण मटकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या सचिव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील, उपप्राचार्या सौ. नीलम बोकिल , करियर काऊन्सिल सेल च्या प्रमुख प्रा. सविता बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील होत्या.
आपल्या भाषणात त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या यशाचा चढता आलेख स्पष्ट केला. विद्यार्थिनींसाठी राबविले जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सविता बोरसे ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. आपल्या भाषणात मुख्य अतिथी भूषण मटकरी ह्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थिनींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आनंद व्यक्त केला. वक्त्याला आपल्या आवाजाने आपली ओळख निर्माण करावी लागते असे ते म्हणाले. आवाजाच्या वेगाची , गतीची जाणीव ठेवणे महत्वाचे असते . त्यांनी पुढे अमिताभ बच्चन , लता मंगेशकर ह्यांचे उदाहरण दिले. कुमार विश्वास यांचे विडिओ पहाण्यास सांगितले. वाचनाने समूद्ध होण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रणेता निकुंभ यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. गीतांजली गीते ह्यांनी केले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला मिळाला.
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०