





सिन्नर एमआयडीसी होणार नाशिक मधील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 11 फेब्रुवारी 2024 β⇔ सिन्नर , दि,11( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) – सिन्नर तालुक्यातील माळेगाव – सिन्नर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी शेजारच्या मापारवाडी शिवारातील 204 एकर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून यासाठी एकरी 52 लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. जमीनधारकांना त्याचा मोबदला दिल्यानंतर उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामुळे माळेगाव – सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील जागेची टंचाई दूर होऊन नवीन उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माळेगाव सिन्नर ही 22 हजार एकरवर असलेली नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत होणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510