β : नाशिक :⇔खाजगी वाहनांवर”पोलीस” चिन्ह वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔खाजगी वाहनांवर"पोलीस" चिन्ह वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
खाजगी वाहनांवर “पोलीस” चिन्ह वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 10 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.10 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून खाजगी वाहनांवर “पोलीस” बोधचिन्ह किंवा “पोलीस” असा मजकूर वापरण्याच्या घटनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेआहेत. हे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबईचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जारी केले आहेत. पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी यासंदर्भात तक्रार ईमेलद्वारे केली होती. त्यानुसार, वायूवेग पथकामधील सर्व मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात खाजगी वाहन तपासणी दरम्यान अशा प्रकारचे “पोलीस” बोधचिन्ह अथवा “महाराष्ट्र शासन” अशी पाटी किंवा चिन्ह असलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, पोलिस अधिकारी, अंमलदार, आणि त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनांवर लाल रंगाची “पोलीस” पाटी लावून वाहन चालवू नये. अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, मा. उच्च न्यायालयाने यासंदर्भात नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारे “पोलीस” पाटी लावून खाजगी वाहन चालवल्याने कायद्याचे उल्लंघन होऊ शकते आणि पोलिसांची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असते. तसेच, नाकाबंदी किंवा सुरक्षा तपासणी टाळून अशा वाहनांना सोडले जाऊ शकते, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे सर्व प्रभारी पोलिस निरीक्षकांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या खाजगी वाहनांवरून “पोलीस” पाटी आणि चिन्ह असलेले स्टिकर्स त्वरित काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत. यापुढे अशा प्रकारची पाटी किंवा स्टिकर्स आढळल्यास, संबंधित पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )