सुरगाणा तालुक्यात करंजूल( पे) येथील शेतकरी बेपत्ता.शोध सुरु.तर एकाचा पुरात वाहून मृत्यू, तालुक्यातील सलग चौथी दुर्घटना

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 5 ऑगस्ट 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि.5 (प्रतिनिधी : रतन चौधरी ):- करंजुल (पे.) येथील अंदाजे पन्नास वर्षीय शेतकरी बैजू बन्सु चौधरी हे त्यांच्या बैलांना चारण्यासाठी सकाळी पाच वाजता गेले होते. संध्याकाळ झाल्यानंतर त्यांचे बैलं घरी आले. मात्र स्वत: बैजू हे ऊशिर होऊनही घरी पोहोचले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यामुळे घरी येतांना रस्त्यात नार नदी लागत असल्याने ते पूरात वाहून गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी तहसिलदार रामजी राठोड, बाऱ्हे पोलिस निरीक्षक सोपान राखुंडे, तलाठी जितेंद्र भोंडवे, पोलिस पाटील पुंडलिक जाधव आदींनी भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. बैजू चौधरी यांचा शोध घेणे सुरु आहे. तर दुसरीकडे सराड येथील शेतकरी देवानंद हिरामण भोये वय ५० हे शनिवारी सकाळी मी शेतात जातो असे सांगून घरा बाहेर पडले. ते घरी न परतल्याने घरच्यांनी दोन दिवस शोध घेतला असता आढळून आले नाहीत. सोमवारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह शेता लगतच्या तलावाच्या पाण्यावर तरंगत असतांना आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील कांतीलाल भोये यांनी दिली. पोलीस पाटील यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार मयत शेतकरी शेतात जातांना जांभळीचा ओहोळ पार करीत असतांना जोरदार पूर आल्याने पाय घसरुन पडले. पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ही तिसरी दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )