





बिटको महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 जून 2024
β⇔नाशिक रोड, दि.8 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):-गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एन. सी. कला, जे. डी. बी. वाणिज्य आणि एन. एस. सी. विज्ञान महाविद्यालय, नाशिकरोड, नाशिक च्या भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जांभूळ, अर्जुन, आंबा इत्यादि झाडांचे रोपांचे वृक्षारोपण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य व NCC एअर विंग कमांडर डॉ. आकाश ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधाकर बोरसे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कांचन सनानसे , विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ.के.सी.टकले, प्रा.भट सर, प्रा.प्रेरणा लहाने तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी खड्डे खणण्यासाठी एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)