β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी – (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 6 जानेवारी 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर , दि.6 (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे ) :- त्र्यंबकेश्वर येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व समाजशास्त्र विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये लिंग समभाव अर्थात Gender Sensitaization या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मेत्ता फाउंडेशनचे अध्यक्ष व मानसोपचार तज्ञ डाॅ. प्रविण गांगुर्डे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी भूषविले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.प्रविण गांगुर्डे यांनी क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मांडला. आपण सर्वच सवित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचे ॠणी असायला हवे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच प्रमाणे लिंग समभाव ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध मानसशास्त्रीय योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधला.
कार्यकमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.दिलीप पवार यांनी स्त्री- पुरुष समानता ही समाजासाठी आवश्यक असुन सर्वच क्षेत्रात स्त्रियांसाठी समानता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की, काळ बदलला असुन आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने ठामपणे उभी आहे.म्हणुन स्रिला सन्मान देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक प्रा. संदिप गोसावी यांनी केल. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे,सकाळ सत्रप्रमुख डॉ.राजेश झनकर, प्रा.प्रशांत रणसुरे, डाॅ.संदिप निकम,डाॅ.संदिप माळी प्रा.समाधान गांंगुर्डे,प्रा. उत्तम सांगळे, डॉ.दिनेश उकिर्डे,डाॅ.भागवत महाले,प्रा.मनोहर जोपळे, प्रा. ऋषिकेष गोतरणे,प्रा.विष्णु दिघे डॉ.जया शिंदे प्रा. मंजुषा नेरकर,प्रा.शाश्वती निर्भवणे,डाॅ.सोनाली पाटील, डॉ. मनिषा पाटील प्रा.अर्चना धाराव, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.संदीप गोसावी यांनी केले तर डॉ.शरद कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो 8208180510
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)