β : नाशिक :⇔नाशिक शहरात मन हेलावणारी दुर्घटना नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,नंतर आई,वडील आणि भाऊ यांचा मृत्यू , पंधराव्या दिवशी महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔नाशिक शहरात मन हेलावणारी दुर्घटना नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,नंतर आई,वडील आणि भाऊ यांचा मृत्यू , पंधराव्या दिवशी महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
नाशिक शहरात मन हेलावणारी दुर्घटना नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,नंतर आई,वडील आणि भाऊ यांचा मृत्यू , पंधराव्या दिवशी महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 21 जून 2024
β⇔नाशिक, दि.21 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- आजारपणामुळे नऊ वर्षे मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या तेरावीचा विधी होत असताना आईची तब्येत खालावते आणि तिचा पण मृत्यू होतो. या दोघांच्या मृत्यूचा धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप लेकाला ही काळाने गाठले.घरात बाप आणि लेखाचा मृत्यू आढळून आला आहे.
या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या महिन्याभरात पाथर्डी फाटा परिसरात वासन नगरातील हसत खेळत महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं, सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे अवघ शहर हळहळत आहे . तुषार महाजन आणि कुटुंब जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील हिंगोली येथील मूळ रहिवासी होते. गेल्या दोन अडीच वर्षापासून नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील वासन नगर येथे वास्तव्यास होते. तुषार महाजन यांना दोन मुलं, एक मुलगा कार्तिक तेरा वर्षाचा तर मुलगी हर्षदा ९ वर्षाची हर्षदाला काही दिवसापूर्वी ताप आला होता. हा ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 25 दिवसांपूर्वी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चिमुकल्या लेकीच्या मृत्यूचा आई स्वातीला धक्का बसला होता. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा तेरवीचा विधी होत असताना आईची तब्येत बिघडते आणि त्याच्या उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या ऊपचारादरम्यान आईचा देखील मृत्यू झाला. पंधरा दिवसात पत्नी आणि ९ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने तुषार महाजन यांना मोठा धक्का बसला होता. पत्नी आणि मुलीच्या निधनामुळे खचलेल्या तुषार आणि कार्तिक यांना धीर देण्यासाठी नातलगांणी बरेच प्रयत्न केले. मुलाकडे बघून या दुखातून बाहेर पडा अशा शब्दात नातेवाईक धीर देत होते. मात्र कुटुंबावर झालेला आघात तुषार यांना सोसवला नाही. सोमवारी या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शर्माळे आणि त्याचे सहकारी दाखल झाले. दोघांचेही मृत्युदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तुषार आणि कार्तिकने आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.पुढील तपास नाशिक पोलीस करीत आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)