





मराठा सेवा संघ नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रसाद सोनवणे, नाशिक शहर अध्यक्षपदी इंजि.स्वप्नील पाटील

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 8 एप्रिल 2024
β⇔ नाशिक, दि.8 (प्रतिनिधी : शाश्वत महाले):- नाशिक येथील पार पडलेल्या मराठा सेवा संघ संचलित, राज्यकार्यकारणी यांच्या उपस्थितीत मराठा उद्योजक कक्ष पदग्रहण समारंभ संपन्न झाले. यावेळी मराठा सेवा संघ राज्यकार्यकारणीने सहविचार बैठक घेवून नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आणि नियुक्तीपत्र या कार्यक्रमात देण्यात आले. मराठा सेवा संघ नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सटाणा मविप्र संचालक- डॉ. प्रसाद सोनवणे, मराठा सेवा संघ नाशिक शहर अध्यक्षपदी -इंजि.स्वप्नील पाटील तर कार्यध्यक्षपदी नितीन मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी कार्यक्रमात प्रसंगी मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष -राजेंद्रसिंह पाटील, इंजि. अविनाश पाटील, मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. के. डी. पाटील, मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष शिवश्री सुधाकर पाटील, मराठा उद्योजक कक्ष राज्य समन्वय शिवश्री दिपक भदाणे, प्रदेशाध्यक्ष-शिवश्री राजेंद्र निबाळते, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष-शिवश्री विशाल देसले, मराठा उद्योजक कक्ष विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज, नाशिक व नाशिक येथील उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510