





येडशीत महावितरणचा खंडित विद्युत पुरवठाचा झटका, नागरिकांना फटका, वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 9 जून 2024
β⇔येडशी, दि.9 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- येथे ग्रामस्थांना कडुन मिळालेल्या माहितीनुसार अशी की , मागील काही अनेक महिन्यांपासून येडशीमध्ये महावितरणाकडून विद्युत विज खंडित ठेवण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. हा खंडित विद्युत पुरवठा मुळे नागरिकांचे डोकेदुखी ठरत आहे. या खंडित महावितरण विजवर कोणीही लक्ष देत नाही नियमानुसार असे की, येडशी ग्रामपंचायत सरपंचाने महावितरणाला पत्र देऊन येडशीकरांना समाधान लागते. परंतु असे काही होत नाही. न्यूज चॅनल – दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलचे प्रतिनिधीने सतत ग्रामपंचायत महिला सरपंचचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रशांत पवार यांच्याशी सतत संपर्क केले. परंतु आज पर्यंत कोणतेही महावितरणाला पत्र दिले नाही.
येडशी प्रतिनिधी व ग्रामस्थांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क केला असता यांच्याकडून नेहमी उडवा – उडवीची उत्तरे मिळत असत्तात. सदर सहायक अभियंता फोन उचलत नाही म्हणून ‘तेर’ चे सहाय्यक उपअभियंता यांच्याशी संपर्क करून माहिती घेण्यासाठी फोन केला असता कधी फोन उचलता तर कधी फोन उचलत नाही. जर फोन उचलला तर खोटी माहिती देत उडवा – उडवीची उत्तरे ग्रामस्था व प्रतिनिधीला दिली जाते.
येडशी ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी प्रतिनिधी व ग्रामस्थांनी सब स्टेशनला माहिती घेण्यासाठी फोन केला असता . धाराशिवहुन मेन लाईनचा घोटाळा आहे, अशी खोटी माहिती ग्रामस्थ व प्रतिनिधीला दिली जात आहे. प्रतिनिधीने माहिती विचारण्यासाठी कोणाला विचाराचे ? आज येडशी मधील मागील काही अनेक महिन्यांपासून महावितरण खंडित विद्युत पुरवठा करत आहे, त्यामुळे या खंडित विद्युत पुरवठ्याला नागरिक वैतागुन गेले आहेत, शासनाने अधिकारी आणि लोक प्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमणूक केलेली आहे, हे विसरता कामा नये.
विद्युत महामंडळ व शेतकरी बांधव यांना वारंवार विचारांना केली तरीही सकाळी , दुपारी, संध्याकाळी तर , कधी – कधी दिवसभर येडशी गावात लाईट नसते, फक्त यांना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांना विद्युत बिले देणे, इतकेच काम आहे. जर एखाद्या नागरिकांने विद्युत बिल नाही भरले तर , नागरिकांचे लाईट कनेक्शन कट केली जाते. अशा घटनेला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळातच या दोघांकडून कोणतेही काम होत नसल्याने ग्रामस्थ , शेतकरी बांधव नाराजी होत आहेत. तरी या महावितरणचे सर्वांत मोठे वरिष्ठ अधिकारी यांनी येडशी गावाकडे लवकरात लवकर दखल घेऊन , या दोघांची बदली करण्यात यावे . अशी मागणी ग्रामस्थांना कडुन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)