





जि.प. शाळा आंबाड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
(जि.प.शाळा आंबाड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा-(प्रतिनिधी : देविदास गायकवाड)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔आंबाड (नाशिक), दि.9 (प्रतिनिधी : देविदास गायकवाड ):-जिप शाळा आंबाड येथे आंबाड शाळेत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्मा स्मारकापासून पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावातून आदिवासी नृत्य व कलापथकाची रॅली काढण्यात आली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. आदिवासी नृत्य व कलापथकाचा कार्यक्रम करण्यात संपन्न झाला. यात आदिवासी बांधवांनी आपल्या कला व नृत्य सादर केले.



यावेळी कार्यक्रमाला आंबाड गावचे युवा कार्यकर्ते देविदास गायकवाड, सरपंच ताई विमल चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोवर्धन शेखरे, माजी सरपंच विठ्ठल पाडवी, धनराज चौधरी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या प्रमिला गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )