बिटको महाविद्यालयातील राजाभाऊ गोडसे सेवानिवृत्त
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 29 मे 2024
β⇔नाशिकरोड,दि.29 (प्रतिनिधी:संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालय कार्यालयात ‘ लॅब अटेंडंट ‘ पदावर कार्यरत असलेले कर्मचारी श्री. राजाभाऊ सहादू गोडसे हे ४४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात मनमिळावू स्वभाव, मेहनत व कामावरील निष्ठेच्या बळावर उत्कृष्ट सेवा बजावली . त्यानिमित्ताने संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच कुलसचिव राजेश लोखंडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सेवापूर्ती गौरव करून दीर्घायुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )