Breaking
ब्रेकिंग

 β:बाऱ्हे (सुरगाणा) :⇔बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सावळा गोंधळ,कर्मचारी अर्धवट ड्युटी करून होतात फरार,रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल(प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)

 β:बाऱ्हे (सुरगाणा) :⇔बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सावळा गोंधळ,कर्मचारी अर्धवट ड्युटी करून होतात फरार,रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल(प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)

0 0 2 8 6 9

बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सावळा गोंधळकर्मचारी अर्धवट  ड्युटी करून  होतात फरार , रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल

 β:बाऱ्हे (सुरगाणा) :⇔बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सावळा गोंधळ,कर्मचारी अर्धवट ड्युटी करून होतात फरार,रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल(प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)
β:बाऱ्हे (सुरगाणा) :⇔बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सावळा गोंधळ,कर्मचारी अर्धवट ड्युटी करून होतात फरार,रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)
βदिव्य भारत बीएसएम न्यूज  वृत्तसेवा  : नाशिक : शुक्रवारदि 22 डिसेंबर 2023 

 β⇔ बाऱ्हे (सुरगाणा) ,ता. 21  ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) :- नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या सुरगाणा तालुक्यातील  बाऱ्हे ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांनी ग्रासले आहे .या रुग्णालयातील कर्मचारी फक्त शासनाच्या तिजोरीवर भार असून अर्धवट काम करत हजेरी लावून पूर्ण ड्युटी न करताच होतात फरार त्यामुळे रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत.  शासनाने आदिवासी गावातील शासकीय नोकरदारांवर लक्ष्य देण्याची वेळ आली आहे.

               सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे विभाग हा प्रमुख बाजारपेठ असलेला भाग आहे. या भागात 30  ते 40 गावांचे  हजारो नागरिक राहतात, त्यांचा संपर्क बाऱ्हे येथे विविध शासकीय कार्यालयाशी येत असतो परिसरात हे मध्यवर्ती छोटेसे शहर असून  शासकीय तलाठी , ग्रामसेवक , रुग्णालय , बँक , व्यापार आदीसह विविध महत्वपुर्ण कार्यालयामुळे लोकांची वर्दळ असते. आठवडे बाजार भरत असल्याने  व्यवहारासाठी सदैव नागरिकांची गर्दी असते.  सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले असून या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत परंतु 108 रुग्णवाहिकाची मागणी बऱ्याच दिवसा पासून प्रलंबित आहे.  या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने काही कर्मचाऱ्यांची रुग्णालया रूग्णासोबत नेहमी अरेरावी भाषा,वाद होत असतात. येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे  नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. उपचार बाजूला आणि या कर्मचाऱ्यांच्या आरेरवी रुग्णांना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा व उपचार करतांना कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष राहते.बाऱ्हे येथील रुग्णालयात सुमारे  25 ते 30 कर्मचारी आहेत. परंतु काही कर्मचारी फक्त हजेरी लावण्या पुरतेच येत असतात. काही कर्मचारी हजेरी पत्रकानुसार कर्तव्य न करता फक्त 3 ते 4 तास ड्युटी करून नाशिकची वाट धरतात, असे  नागरिकांचे म्हणणे आहे. या रुग्णालयाचे कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष कोणी ठेवत नाही, बाऱ्हे येथील लोकप्रतिनिधी सुद्धा झोपेची सोंग घेऊन शांत बसलेले असतात.

               बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खिर्डी – भाटी, भेंनसेत, खोबळा, कांडोळपाडा, मांडवा, सागपाडा, आदीसह 30 ते 40  गावे हे गुजरातच्या सिमेवर वसलेली असून त्यांना उपचारासाठी बाऱ्हे शिवाय दुसरे पर्यायी व्यवस्था नाही.  अशी आदिवासी दुर्गम भागातून गोरगरीब नागरिक उपचार घेण्यासाठी येतात , परंतु त्याच्या पदरी फक्त निराशा पडते आणि आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे . बाऱ्हे येथील रुग्णालयात  कधी गोळ्या,औषधे संपतात तर कधी एक कर्मचारी असतो तर दुसरा गायब असतो.अशा सर्व प्रकाराला कंटाळून नाईलाजाने नागरिकांना खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.  आदिवासी बांधवांसाठी  रुग्णालयातील  हा सगळा गैरप्रकारबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते  रुग्णांच्या तक्रारीवरून  दिपक देशमुख, चंद्रकांत जाधव, विलास जाधव, हे ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असता, तेथे कर्मचारी अनुस्थिती आढळुण आले तर काही कर्मचारी मनमानी पद्धतीने गैरहजर होते . या सगळ्या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देऊन रुग्णांना सुरळीत सुविधा मिळतील अशी व्यवस्था करण्यात यावी ,अशी मागणी दिपक देशमुख, चंद्रकांत जाधव, विलास जाधव ,रामदास देशमुख यांनी केली आहे . 

               केली प्रक्रिया रक्त तपासणी रुग्ण आज दि.20-12-2023 रोजी मी बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी करिता गेलो होतो पण या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नव्हते , मी रुग्णालयातील उपस्थिती डॉक्टरांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की लौबमध्ये रक्त तपासणी करणाऱ्या कर्मचारी मॅडम कुठलीही  रजा न घेता दुपारी मनमानी पद्धतीने निघून गेल्या आहेत त्यामुळे रक्त तपासणी उद्या होईल , असे रुग्ण रामदास देशमुख यांना सांगितले.अशा प्रकारे सावळा गोंधळ बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे खुच हाल व आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने व वरिष्ठ पातळीवरून अधिकारी वर्गाने त्वरित हा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे .   

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज  : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले  :मो ८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!