संदीप फाऊंडेशन फार्मसी महाविद्यालयात ” जी-पॅट “ वर मार्गदर्शन…
β⇒दिव्य भारत बी. एस.एम न्यूज : नाशिक:मंगळवार , दि २९ ऑगस्ट २०२३
β⇒ नाशिक : ( महिरावनी), ता . २९ ( प्रतिनिधी :डॉ. कमलेश दंडगव्हाळ ) येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात ” जी पॅट ” या स्पर्धा परीक्षेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . सदर व्याखानाकरिता ” जी-पॅट-२०२३ ” परीक्षेमध्ये भारतातून पहिला क्रमांक मिळवणारा विद्यार्थी महेंद्र महाजन यास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थाना परीक्षेची तयारी कशी करावी. वेळेचे नियोजन ,संदर्भ पुस्तके व अभ्यासाविषयी अनेक बारकावे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनेक शंकांचे निरसन केले.
प्राचार्य डॉ. बोरसे सरांनी महेंद्र महाजन चे स्वागत करून, त्याने अतिशय खडतर परिस्थितीत जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर यश संपादन केले आहे असे नमूद केले. महाविद्यालयाने जी-पॅट करिता या मार्गदर्शन पर समुपदेशन विभागाची स्थापना केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेतली जाते. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन व परिक्षयेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम शिकवला जातो , सराव प्रश्नपत्रिका संच तयार करून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतला जातो. महाविद्यालयाचे जी-पॅट विभाग प्रमुख डॉ. शेवाळकर सर आणि प्रा. येलमामे सर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करून आभार व्यक्त केले.
दिव्य भारत बी एस न्यूज : मुख्य संपादक :डॉ . भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)