





येडशी महामार्ग पोलिसांकडून जागतिक स्मरण दिन साजरा

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 24 नोव्हेंबर 2023
β⇔येडशी(धाराशिव), ता.24 ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- येथील रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी , गंभीर जखमी, अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ व अपघात पिढीतांच्या कुटुंबियांच्या सांत्वनांकरिता महामार्ग पोलीस सहाय्यता केंद्राकडून स्मरण दिन साजरा करून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. कायदेशीर महामार्गदर्शनाकरिता सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा जागतिक स्मरण दिन पाळण्यात आला.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) रवींद्र सिंगल, छत्रपती संभाजी नगर येथील महामार्ग पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, महामार्ग पोलीस उपधीक्षक श्रीकांत डीसले,छत्रपती संभाजीनगर महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी, यांच्या मार्गदर्शनाखाली 19 नोव्हेंबर रोजी महामार्ग पोलीस केंद्र येडशी (धाराशिव) येथील बस स्थानक जनता विद्यालय येडशी, आळणी चौक, येरमाळा चौक व महामार्ग पोलीस केंद्र समोरील येडशी टोल नाका या ठिकाणी पोस्टर व बॅनर लावून अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे स्मरण करण्यात आले.
राज्यात रस्ते अपघातात प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू नये म्हणून वाहतुकीच्या नियमांबाबत महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे यांनी उपस्थित प्रवासी, वाहतूक चालक व वाहक मालक यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आव्हान केले आहे. यावेळी स.पो. पोलीस निरीक्षक जे. एन. गुंड, अमोल खराडे, अमोल कलशेट्टी, रविराज बारकुल, राजेंद्र मस्के, अमर माळी, कुणाल दहीहांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक :डॉ.भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
