





“हमारा एक ही सपना ! निरोगी रहे घर अपना !!”

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक (शहर), दि.19 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- नाशिक येथील ‘आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक’ डी मार्ट च्या समोर ,पाईप लाईन रोड नाशिक येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन सकाळी ६:३० वाजता करण्यात आले होते. याप्रसंगीप्रमुख मार्गदर्शक जागतिक आरोग्य सल्लागार आदरणीय संतोष पाटील (प्रेसिडेंट टीम मेंबर) यांनी “जेवण आणि जीवन” याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. नाशिक पश्चिमेच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांनीही या कार्यक्रमा प्रसंगी हजेरी लावली आणि लोकांना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचे वेलनेस परिवाराचे स्वप्न साकार करावे,असे नागरिकांना आव्हान केले.
या प्रसंगी ग्रेट आरोग्य सल्लागार अनुराधा व संजय घायाळ हे ही जालना येथुन खास उपस्थिती होते. या कार्यक्रमात ग्रेट वेलनेस कोच कार्यक्रमाचे आयोजक प्रा. शोभा सुरोशे, आज ज्यांचा वाढदिवस होता असे राजेश सुरोशे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी नारायण जाधव, अरुण नाना, आनंदी आनंद ,जॉगिंग ट्रॅक अध्यक्ष साहेबराव मौले, आनंदी विरंगूळ ज्येष्ठ नागरिक संस्थापक अध्यक्ष जयश्री व नरेंद्र झोपे, राहुल सुथार, लिला सुथार, गणेश ढोणे, अविनाश विसपुते, विजया पाटील, कविता व ईश्वर चौधरी, सुवर्णा पाटील, अलका गरड, रंजना पाटील, रवी गामणे आणि पंचक्रोशीतील सन्माननीय नागरिक वडीलधारी मित्र मंडळी या सर्वांचे मोलाचे सहकार्य आम्हा सर्वांना लाभले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )