β : सटाणा :⇒ “रक्षाबंधन “आदर्शवत उपक्रमातून मुलांमध्ये सामाजिक मुल्ये जोपसली जातात “- आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त – गणेश महाले ( प्राथ. शिक्षक-कठगड -ताहाराबाद )
β : सटाणा :⇒ कठगड (ताहाराबाद) जि.प. शाळेत विद्यार्थ्यांनी राखी बांधून " रक्षाबंधन " उत्साहात साजरा !
कठगड (ताहाराबाद) जि.प. शाळेत विद्यार्थ्यांनी राखी बांधून ” रक्षाबंधन ” उत्साहात साजरा !
” रक्षाबंधन “ आदर्शवत उपक्रमातून मुलांमध्ये सामाजिक मुल्ये जोपसली जातात “- गणेश महाले ( प्राथ. शिक्षक-कठगड -ताहाराबाद )
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळावर , दि २९ ऑगस्ट २०२३
β⇒ सटाणा , ता २९ ( खास प्रतिनिधी ) :- कठगड (ताहाराबाद) येथील जिल्हा परिषद शाळा कठगड -ताहाराबाद (ता. सटाणा) शाळेत विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांनी राखी बांधून ” रक्षाबंधन “राखी पोर्णिमा सणानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला. राखी पोर्णिमा असल्याने आज मुलांना सामाजिक समतेचे मुल्ये बाल वयात रुजवण्याचे काम कठगड ( ताहाराबाद) जि. प. शाळेतील शिक्षकांनी केले आहे .
यावेळी बोलतांना या बाल वयात केले गेलेले संस्कार दिर्घकालीन समाजात तरुणांना सामाजिक मूल्य ,संस्कार हे थोर मोठ्यांचे आदर करणारे ठरत असतात आणि प्रत्येक मुलगी आपली बहिण आहे, तिचे रक्षण करणे आपले कर्तव्ये आहे . याची जाणीव विद्यार्थ्याना होवून नैतिक जबाबदारीचे भान तरुणपणी मुलांमध्ये रुजल्याने निकोप समाज तयार होईल, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त -गणेश महाले यांनी केले. आमची शाळा नियमित विद्यार्थ्याना ” सणाचे औचित्य साधून सामुहिक रक्षा बंधन उपक्रमातून मूल्याची रुजवण करत कठगड शाळेत आदर्शवत उपक्रम राबवत असते . यावेळी शाळेच्या शिक्षिका ,विद्यार्थी,पालक ,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . या निमित्ताने सणाचे औचित्य साधून सामुहिक रक्षा बंधन उपक्रमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो. ८२०८१८०५१०