प्रबोधन विद्यालय व जि.प.प्राथमिक शाळा अंबाठा येथे मतदार जनजागृतीनिमित्त रॅली व पथनाट्य सादर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 8 एप्रिल 2024
β⇔ सुरगाणा , दि.8 (प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ):- सुरगाणा तालुक्यातील प्रबोधन विद्यालय अंबाठा व जि.प. प्राथमिक शाळा, अंबाठा शाळेतील विद्यार्थ्यांनी 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकनिमित्त “मतदान जनजागृती ” आठ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता अंबाठा गावात रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅलीत विविध घोषणा दिल्या. प्रबोधन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे मतदान करण्याबाबत गावातील लोकांना आवाहन केले. या पथनाट्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमासाठी प्रबोधन विद्यालयातील मुख्याध्यापिका सिस्टर थेरेसा व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जि.प. शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510