संदीप विद्यापीठच्या विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमशाळेच्या विद्यार्थांसोबत मिठाई वाटप करत आनंद द्विगुणीत करून दिवाळी सण साजरा
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 18 नोव्हेंबर 2023
β⇔महिरावणी (नाशिक), ता.18 (प्रतिनिधी: डाॅ. कमलेश दंडगव्हाळ) :- दिवाळी आली की प्रत्येकालाच नवीन कपडे आणि फराळाची ओढ लागली असते. सर्वजण आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करतात. मात्र ज्यांना कुटुंब नाही , अशी लहान मुले या आनंदोत्सवाला पोरकी होतात. कर्तव्य जाणीवेतून संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्यावतीने 7 नोव्हेंबर रोजी अशाच त्र्यंबकेश्वररोड येथील अनाथ आश्रमशाळेच्या विद्यार्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
यावेळी विद्यार्थांना महाविद्यालयातर्फे दिवाळीची भेट देण्यात आली. यात फराळ, मिठाई, फळे,दैनंदिन गरजेच्या वस्तू, स्टेशनरीचा यात समावेश होता. आमच्यासाठी हा वेगळा आनंददायी अनुभव असल्याचे उपस्थित विद्यार्थांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे यांनी सामाजिक बांधिलकीचे जतन करत ही दीपावली सर्वांना सुखाची व आनंदाची जावो यासाठी ईश्वराकडे कामना व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कल्पेश खैरै व शिक्षक कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनाकरीता मेहनत घेतली.
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०