





निष्ठावान कार्यकर्ता सत्यवचनी हरिश्चंद्र चव्हाणांची बंडखोरी अटळ;भाजपात घमासान दिंडोरीत चव्हाणांचा विजय निश्चित, आज उमेदवारी अर्ज भरणार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 1 मे 2024
β⇔नाशिक,दि.1(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):-“एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असतांना नाराज माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंडोखोरीवर शिक्का मोर्तब झाले आहे. आज दि.2 मे रोजी परशुराम सायखेडकर नाट्य गृहात सकाळी दहा वाजता हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असुन बैठकीनंतर दिंडोरी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.अनामत रक्कम भरणा करणेपासुन ते कायदेशीर बाबी पाडण्यात आल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना आज सूचना देण्यात आल्याचे हरिश्चंद् चव्हाण यांनी सांगीतले.
विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गेल्या महीना भरापासून लोकसभा मतदार संघातील शेतकरी बांधव, भाजपा कार्यकर्ते, विविध आदिवासी संघटना, पक्ष संघटना, शेतकरी संघटना, बाबाजी भक्त परीवार, युवक संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपन निर्णय घेतल्याचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.
हेचि फळ काय मम तपाला :- अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने आपली पक्षनिष्ठा पाहिली असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्याऐवजी शेतकऱ्यांना,लोकांना, कार्यकर्त्यांना दम दिला जातोय कुठे नेऊन ठेवला भाजपा असेच म्हणावे लागेल.
जनता माझ्या सोबत :-सत्ताधारी पक्षात असूनही शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नांवर आम्हीं लोकसभेत रान पेटऊन संपूर्ण निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांची न्याय बाजू मांडली होती. बळी राजाला कधी दम दिला नव्हता. जमिनी वरच राहिलो कधी सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिली नाही, असे प्रतिक्रिया माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितली . शेतकऱ्यांसाठी अभी नहीं तो कभी नहीं.अशी साद घालत उमेदवारी माघारीसाठी नाही, तर विजयी होण्यासाठी करणारच असा आशावाद व्यक्त केला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )