खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत अपघात
β :सिन्नर :⇔खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत अपघात-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 19 फेब्रुवारी 2024
β⇔ सिन्नर, दि.19 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे दिल्लीला संसद भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असता त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने हेमंत गोडसे हे बचावले आहेत. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते दिल्लीत आले होते.
आज कार्यक्रम संपल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी परत येत असताना हा अपघात झाला. एका गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या गाडीने त्यांच्या गाडीला जोराने धडक दिली . त्यात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र हेमंत गोडसे सुदैवाने बचावले त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510