महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना तर्फे श्री.भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
β : नागपूर :⇔महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना तर्फे श्री.भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी – ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि.13 डिसेंबर 2023 β⇔ नागपूर,ता.12( प्रतिनिधी : रमेश लांजेवार ):-श्री.भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने विधानभवनावर धडक मोर्चा काढुन मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 ला इंदोरा मैदान येथून विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होते. कलाल-कलार समाज हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र विखुरलेला आहे.परंतु महाराष्ट्रामध्ये कलाल – कलार समाजावर होत असलेल्या सामाजिक व आर्थिक अन्या याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय व राजकीय क्षेत्रात राज्याचा एकही प्रतिनिधी नसल्याने समाजातील प्रश्न शासनापर्यंत पोहचु शकत नाही.यामुळे समाज प्रगतीच्या मार्गापासून व शासनाच्या योजनांच्या प्रवाहापासुन दुरावलेला आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात कलाल -कलार समाजातील संपूर्ण शाखांचा विचार केला तर समाजाची लोकसंख्या 55 लाखापेक्षा अधिक आहे.
आजही संपूर्ण समाज कळत-नकळत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजसेवा व देश सेवा करीत आहे.परंतु आजही विचार केला तर कलाल -कलार समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे आपल्याला दिसुन येते.यामुळे समाजातील बेरोजगार व शिक्षित युवकांना मोठा फटाका बसत आहे. याकरिता कलाल – कलार समाजाकरीता सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून समाजाची मागणी आहे, की 1)भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ सरकारने स्थापन करावे.2)कलाल-कलार समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वस्तीगृहासाठी राज्य शासनाने नाम मात्र किंमतीत समाजाला जागा उपलब्ध करून द्यावी.3) केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कलाल – कलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय (मद्य विक्री) परवाण्यात समाजाला सरकारने प्रथम प्राधान्य द्यावे.
या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री अतुलजी मोरेश्वर सावे , गृहनिर्माण,इतर मागास व बहुजन कल्पना मंत्री यांना देण्यात आले, यामध्ये संघटनेचे मार्गदर्शक व पर्यावरण मित्र चंद्रपालजी चौकसे,संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार, सरचिटणीस संतोष खंबलवार, प्रदेश प्रवक्ता रमेश लांजेवार, जैन कलार समाजाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष अनिलजी अहिरकर, अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, माजी मंत्री अविनाशजी वारजुरकर, माजी आमदार श्री केशवराव मानकर,शशिकांतजी समर्थ,विजय उजवणे, रविंद्र हटवार, फाल्गुन उके ,डॉक्टर प्रमोद मेहस्रे,महेंद्र डोहरे,नरेंद्र धुवारे,दीपक वालोदे, प्रमोद मानकर, शेखर डहरवाल, खिलेंद्र बिठले, दिपक उके,सुरेश चौरीवार,राजू वारजूरकर,विश्वास गोसेवाडे, प्रशांत तिडके, मंगेश डांगे, श्री वासेकर,सतीश दखने, रुपाली उके, संदीप तिडके, नंदलाल कावरे,मंगेश खानोरकर, सुनील दहीकर, गजानन पटेल, ॲड.सुर्यकांत जैस्वाल, संजय ठठेरे, दिपक आदमने,सौ.सिमा खंबलवार, रूपाली उके, सुरेश आदमने,विक्रांत पालांदुरकर, सुनील खराटे,पंकज दहिकर, बाबाराव देवलावार, नितीन बासंबे,सौ. संगिता ठठाल, सुरेश मेश्राम, अनिलजी पिंपळे, सुरेश सौ.विणा पटेले,आणि सर्व शाखेचे संपूर्ण समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)