β : नाशिक :⇔पर्यावरण पूरक गणेशोत्सव, महापालिका ॲक्शन मोडवर ! सात मूर्तिकारावर कारवाई,70 हजाराचा दंड वसुल-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔पर्यावरण पूरक गणेशोत्सव, महापालिका ॲक्शन मोडवर ! सात मूर्तिकारावर कारवाई,70 हजाराचा दंड वसुल-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
पर्यावरण पूरक गणेशोत्सव, महापालिका ॲक्शन मोडवर ! सात मूर्तिकारावर कारवाई, 70 हजाराचा दंड वसुल
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 21 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.21 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- गणेश उत्सव लवकरच येत असून शहरातील गणेश उत्सव मंडळ व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. मंडळांनी व नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या न घेता शाळू मातीच्याच मुर्त्या घ्याव्या अशा सूचना नगरपालिकेकडून करण्यात आल्या आहेत. नासिक मधील कमी पर्जन्यमान, प्रदूषण, वाढते तापमान रोखण्यासाठी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर कारवाई करण्यात आली असून जवळ जवळ 70 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी मातीचा गणपती बसवून व त्याचे विसर्जन ही घरीच करावे किंवा मातीत वृक्षारोपण करावे, गणेश मूर्तीला नदी, नाला तलाव ,किंवा विहिरीत विसर्जन करू नये याची नागरिकांनी काळजी घ्यावी. शाळांमध्ये ही जनजागृती केले जाणार असून, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूर्वक गणेशाची स्थापना करण्याची शपथ दिली जाणार आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी महापालिका 100 टन शाळु माती खरेदी करणार असून शहरातील सहाही विभागांमध्ये तिचे वितरण केले जाणार आहे. ही माती सर्व नागरिकांना व मंडळांना मोफत पुरवली जाणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )