





आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे कार्य आणि विचार तरुणांनी आत्मसात करण्याची गरज आहे : प्राचार्य डॉ.किरण रकिबे

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 8 नोव्हेंबर 2023
β⇔ इगतपुरी : ता.8 ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :-आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याचे आणि विचारांचे चिंतन आजच्या तरूणांनी करणे गरजेचे आहे. समाजातील आदिवासी समाजबांधव, गोरगरीब शेतकरी, सावकारी पाशात अडकलेला समाज या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. शेतकरी आणि गरीब जनता सुखी व्हावी हा विचार समोर ठेऊन कार्य करणारे थोर क्रांतीकारक होय. येथील जनतेला आणि या देशाला इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे समाजाने स्मरण करावे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे यांनी केले.
इगतपुरी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्ताने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रबिके यांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. एस.एस.परदेशी, प्रा.के.के.चैरसिया, प्रा.श्रीमती डी.एच.शेंडे, कमानकर सी.जी, दिनेश पाटील, रमेश पवार, सुनिल जाधव, महेश आरोटे, दिघे राहुल, नारायण बेंडकोळी, श्रीमती खाताळे कल्पना, श्रीमती रंजना वरर्देकर, अमोल टिळे, कृष्णा बोराटे, श्रीमती पूजा आरोटे, अनिल कोरडे, चंदू खातळे आदी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
