त्र्यंबकेश्र्वर महाविद्यालयातराष्ट्रीय मतदार दिनउत्साहात साजरा
β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्र्वर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा – (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.26 जानेवारी 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर,दि.26 (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे ) :-येथील मविप्र समाज्याचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे राज्यशास्त्र विभाग, मतदार साक्षरता मंडळ आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन पुणे*राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती, नायब तहसीलदार थकाजी महाले , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार , राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ भागवत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्र्यंबकेश्र्वर शहरात रॅली काढून नवीन मतदार नोंदणी, मतदान जागृती मोहिम, यावेळी रॅली मध्ये विद्यार्थ्यांनीं घोष वाक्य फलक, विद्यार्थ्यानी मतदार राजा जागा हो, मतदानाचा धागा हो, मतदान मूलभूत हक्क केलेच पाहिजे, अशा विविध घोषणा देत परिसर दुमदुमला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार यांनी नवीन मतदार नोंदणी अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आपापल्या गावी नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात सहकार्य करण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर शहरातून रॅली काढून नवीन मतदार नोंदणी अभियान व जन- जागृती अभियान राबविंण्यात आले.राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सामुदायिकपणे मतदार प्रतिज्ञा वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार, आय. क्यु . ए.सी. समन्वयक डॉ. व्ही.बी. सोनवणे, प्रा डॉ संदीप निकम, डॉ.राजेश झनकर, प्रा.उत्तम सांगळे, प्रा. सोनाली पाटील , डॉ नयना पाटील, प्रा. श्रीमती मंजुश्री नेरकर, प्रा. श्रीमती अर्चना धारराव, डॉ जया शिंदे, प्रा. समाधान गांगुर्डे, डॉ.पोपट बिरारी, प्रा मनोहर जोपळे, प्रा ऋषिकेश गोतरणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सोनाली पाटील यांनी केले व आभार डॉ नयना पाटील यांनी मानले. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो. ८२०८१८०८१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)