β : सुरगाणा (ग्रामीण) :⇔जे.पी.गावित यांनी सरकारवर केली टीका ;फक्त आश्वासने देणारे,शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मागण्यां व प्रश्नांचा विचार न करणारे सरकार-(प्रतिनिधी:पांडुरंग बिरार)
β : सुरगाणा (ग्रामीण) :⇔जे.पी.गावित यांनी सरकारवर केली टीका ;फक्त आश्वासने देणारे,शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मागण्यां व प्रश्नांचा विचार न करणारे सरकार-(प्रतिनिधी:पांडुरंग बिरार)
जे.पी.गावित यांनी सरकारवर केली टीका ;फक्त आश्वासने देणारे,शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मागण्यां व प्रश्नांचा विचार न करणारे सरकार
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 25 फेब्रुवारी 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण) ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) :- सरकारने शेतकरी व आदिवासी बांधवांचा प्रलंबित मागण्यांचा विचार करत नाही, आश्वासने देताना सरकार जोशात असते, मात्र आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने रविवार दिनांक 25 फेब्रुवार 2024 रोजी मीटिंगची विनंती केली. तरी पूर्वानुभव लक्षात घेता आम्ही माघे हटणार नाही. आम्ही आमचे नियोजित आंदोलन पार पडणार आहोत , असा इशारा माजी आमदार जे.पी. गावित यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोरच दिला.शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जे. पी.गावित यांच्या नेतृत्वाखाली 21 फेब्रुवारी 2024 पासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ दिंडोरीसह एकूण इतर 15 तालुक्यातून हजारोच्या संख्येने आंदोलनकर्ते नाशिकच्या दिशेने निघाले आहेत.
आंदोलनकर्ते आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नाशिक जिल्ह्याआधिकरी कार्यालयावर धडकणार आहेत. या मोर्चाच्या अनुसंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावली होती.या बैठकिला भुसे यांच्यासह गावित हजर होते. बैठकीनंतर पत्रकारांशी सवाद साधताना गावित यांनी भुसे यांच्यासमोरच सरकारवर तोफ डागली या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र बैठक निष्फल ठरली असून आंदोलक आंदोलन करण्यास ठाम आहेत. सर्व मागण्या मान्य होपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचे महामुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार जे. पी.गावित व पायी मोर्च्यात निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासन दिला आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातून शेतकरी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. याबाबद बोलताना गावित म्हणाले, की कांदा निर्यात बंदी लादून सरकारने शेतकऱ्याना आर्थिक संकटात लोटले आहे. झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडेना , अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवला आहे. यापूर्वी दोनदा मोर्चे काढले आश्वासनाची खैरात झाली पण पूर्तता झाली नाही. आजही पालकमंत्र्यांनी आश्वासने दिलीत मात्र आम्हाला याची आवसेक्ता नाही आमचे मोर्चेकरी शहराच्य अगदी जवळ पोहचले आहेत. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहचतील ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनकर्ते मागे हटणार नाहीत. असा इशारा माजी आमदार जे. पी.गावित यांनी यावेळी दिला आहे . पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार गावित यांची समजूत काढली ते म्हणाले , सरकारने काहीच केले नाही. असा आक्षेप चुकीचा असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510