सृष्टीचे पालनहार “देवादी देव महादेव”!
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 8 मार्च 2024
β⇔नागपूर., दि.8(प्रतिनिधी: रमेश लांजेवार):-भोले शंकर संपूर्ण सृष्टीचे व हिंदू धर्माचे तारणहार दैवत आहे.असे सांगण्यात येते की संपूर्ण ब्रम्हांडामध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे.परंतु यात सर्वांचे पालनहार देवादी देव महादेव म्हणजेच “शिव-पार्वती” आहे. त्यामुळे शंकरजीला भोल्या शंकरा म्हटल्या जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस जे विष निघाले ते शंकरजीनी प्राशन करून संपूर्ण सृष्टीला वाचवीले व विष प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा झाला. शंकराचा वास सर्वसाधारण ठिकाणापासून तर स्मशान भूमीपर्यंत दिसून येतो.म्हणजेच आकार -पाताळ-पुर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण या संपूर्ण ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भगवान शंकरजींचे दर्शन अवश्य होते.त्यामुळेच हिंदुमान्यतेनुसार शंकराच्या मुर्तीची किंवा पिंडाची पुजा केली जाते.
भोले शंभर सर्वसामान्यांचेच देवता नसुन मानव-देव-दानव-किन्नर सर्वांचे आराध्य दैवत आहे.त्यामुळे आजही नागव्दार,महादेव,पचमडी इत्यादी अनेक ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक दरवर्षी महादेवाच्या दर्शनाला जातात व भोल्या शंकराचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. रावनासारखा महाग्यानी घोर राजनितीज्ञ हा सुद्धा शंकरजीचा कट्टर भक्त होता. रावणाची भक्ती पाहून त्यांना वर्दानसुध्दा दीले होते.त्यामुळे शंकरजीची पुजा सर्वांनाच करण्याचा अधिकार आहे.कारण शंकरजींची महीमा अपरंपार आहे.याच उद्देशाने शंकरजींनी आपले वास्तव्य सर्वसामान्यांपासून तर स्मशान भुमीपर्यंत अजरामर ठेवले आहे.आज स्थल,जल,वायु, आकाश-पाताळ, पुर्व-पश्चिम, उत्तर- दक्षिण या संपूर्ण ठिकाणी आपल्याला भोले शंकराचे दर्शन होते.आज आपण नद्यांचा उगम पहातो तो उगम शंकरजींच्या जटेतुन झाल्याचे अनेक कथा व पुराणात पहातो. कोणी मानो अथवा न मानो परंतु आपण या पृथ्वीतलावर हसतो,खेळतो,बागडतो यांचे मुख्य कारण म्हणजे या ब्रम्हांडातील देवी-देवतांचा वासच आहे. कोणतीही देवी-देवता असो त्यांचे स्मरण केल्याने मानसाच्या ह्रदयात व मनात एक उत्सहाचे वातावरण निर्माण होते. कोणताही देव दीसत नसला तरी मनात असला पाहिजे व संपूर्ण शक्ती सत्कर्मासाठी समर्पीत केली पाहिजे.
आज संपूर्ण निसर्ग जो आपल्याला दिसतो त्यात लाखोंच्या संख्येने अनेक वृक्ष, फुले,फळे दिसून येते ही संपूर्ण ईश्वरी देनच आहे.परंतु संपूर्ण निसर्गाची रक्षा करने मानवजातीचे प्रथम कर्तव्य आहे.आपण सत्कर्माचा मार्ग अवलंबवीला तर देवादी देव महादेव आपणापर्यंत अवश्य येईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा पवित्र सन आहे.त्यामुळे महाशिवरात्री हा सन मोठ्या भक्तिभावाने सर्वत्र साजरा केल्या जातो. त्यामुळे आपल्याला सर्वत्र उत्सहाचे व मंगलमय वातावरण दिसून येते.महाशिरात्रीला बेलपत्ती,गोंगलाचे फुले याला जास्त महत्व असते. म्हणजे पृथ्वीतलावरील प्रत्येक झाडाला, फळांना किंवा फुलांना आगळेवेगळे महत्व असते हे आपल्याला दिसुन येते.महादेवाचे गुणगान गाण्यांच्या स्वरूपात आपल्याला ऐकायला व पहायला मिळते. संपुर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 5 महाराष्ट्रात आहे.त्र्यंबकेश्वर, परळी बैजनाथ, भिमाशंकर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे.या व्यतीरीक्त महाराष्ट्रासह भारतात भगवान शंकरजीचे अनेक मंदिरे आहेत.यावरून स्पष्ट होते की भगवान शंकरजीवर सर्वांचीच आस्था आहे.त्याच प्रमाणे ॐ नमो: शिवाय ,ॐ शांती,हर हर महादेव इत्यादींचा जप केल्याने मन प्रसन्न रहाते व शांती मिळते व अनेक आजार दुर होण्यास मोठी मदत मिळते. आपण भोले शंकराचा जयघोष शिवकालीन इतिहासामध्ये सुध्दा ऐकली व पहाली आहे.
शिवाजी महाराज व मावळे लढाईवर जातांना “हर हर महादेव”चा जयघोष करीत असे.यामुळे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होवून एक नवीन उर्जा निर्माण होत होती.त्याचप्रमाणे आजही आपल्याला प्रत्येक शंकरजींच्या मंदिरात भाविकांचा “हर हर महादेव “चा जयघोष ऐकायला मिळतो.यामुळे सर्वांचेच मन प्रसन्न होते व नवीन ऊर्जा निर्माण होते.याचे मुख्य कारण म्हणजे देवादी देव महादेव हे सर्वांचेच पालनहार दैवत आहे.महाशिवरात्रीच्या सणाला भावीक मोठ्या उत्साहाने उपवास ठेवतात यामागचा एकच उद्देश असतो की हे देवादी देव महादेव येणारे विग्न टळुदे व सुख-शांती प्रदान कर. कारण आपण सुखी तर देश सुखी, देश सुखी तर संपूर्ण सृष्टी सुखी.महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी हेच सांगु इच्छितो की स्थल,जल,वायु व निसर्ग याची जोपासना मानवजातीने वेळोवेळी केलीच पाहिजे.आज वाढते प्रदुषण, जंगलातील हिंसक पशु शहरात प्रवेश करने, जंगलाला वनवे लागने,हिमकडा कोसळुन महाप्रलय येने,भुकंप याला रोखण्यासाठी संपूर्ण मानवजातीने निसर्गाची जोपासना केलीच पाहिजे.अन्यथा देवादी देव महादेव विक्राळ रूप सुध्दा धारण करू शकते.याला नाकारता येत नाही.याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहे.आपण निसर्गाची निर्मळ मनाने सेवा व जोपासना केली तर देवांदी देव महादेव अवश्य प्रसन्न होतील.यात दुमत नाही.देशात महाप्रलय,भुकंप,अती उष्णता,अती थंडी, सुनामी,वनवा लागणे, प्रदुषणात वाढ होणे या संपूर्ण गोष्टी निसर्गावर होत असलेल्या अन्यायामुळे दिसून येते.देवादी देव महादेवाचा वास दऱ्या-खोऱ्यात,पहाडात, जंगलात, निसर्गानच्या काणा-कोटऱ्यात व कणाकणात आपल्याला पहायला मिळतो.त्यामुळे महाशिवरात्रीच्या सनाच्या निमित्ताने निसर्गाची जोपासना करण्यासाठी सर्वांनीच संकल्प केला पाहिजे व निसर्ग संपदा विनाशापासुन वाचविली पाहिजे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावले पाहिजे.कारण प्रत्येक वृक्षाच्या पानात, फुलात, फळात आपल्याला भोले शंकराचे दर्शन अवश्य होईल.त्याचबरोबर वृक्ष लागवडीमुळे गुरांना चारा, मानवाला शुद्ध हवा व सर्वांनाच शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल. महाशिवरात्रिच्या निमित्ताने जर वृक्षलागवड झाली तर देशात एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड सहज होईल व निसर्ग प्रफुल्लित होण्यास मोठी मदत मिळेल.हर हर महादेव!
लेखक :-
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९,
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510