त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “हिंदी दिन सप्ताह समारोह” उत्साहात साजरा
हिंदी भाषा रोजगार निर्मितीची क्षमता असलेली भाषा – श्री.सुबोध मिश्र
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.२७ सप्टेंबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर , ता. २७ ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे ):- येथील मविप्र समाजाचे कला, वाणिज्य अणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर, येथे हिंदी विभागांतर्गत “हिंदी दिन सप्ताह समारोह”समारंभ उत्साहात साजरा झाला. हिंदी दिन सप्ताह समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त भारतीय नौसेना इलेक्ट्रानिक्स इंजिनियर व हिंदी भाषा अधिकारी सुबोध मिश्रजी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे होते. त्यानंतर प्रमुख पाहुणे सुबोध मिश्रजी’ पुढे म्हणाले की,’हिंदी ही देशाची प्रमुख भाषा असून तिला सन्मान देणे, हे आपले कर्तव्य आहे, हिंदी ही भाषा आज रोजगार निर्मितीची भाषा असून आज देशाला अनुवादकांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे.म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे हे कर्तव्य पालन करणे गरजेचे आहे असे प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले. तसेच त्यांनी भारतातर्फे अंटार्टिका खंडावर जाण्याचा योग आला ते अनुभव ही कथन केले.त्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले की, हिंदी भाषा राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असून हिंदी भाषेत अनेक इतर भाषेच्या शब्दांचा समावेश असल्याने हिंदी भाषा समृद्ध असल्याचे सांगितले, ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून ही एक सप्ताह संवाद साधण्याचे आव्हान त्यांनी केले. हिंदी भाषा दिन सप्ताहनिमित्त भाषिक कौशल्या विकासाच्या दृष्टीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हिंदी सप्ताहमध्ये निबंध लेखन, काव्य वाचन व भाषण यास्पर्धां घेण्यात आल्या.स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करूंन गौरव करण्यात आला. हिंदी सप्ताह निमित्ताने आयोजित विविध स्पर्धाचे परीक्षक म्हणून डॉ. अजीत नगरकर, डॉ. जया शिंदे, डॉ.भागवत महाले,डॉ. सोनाली पाटील यांनी केले.निबंध लेखन स्पर्धेचा निकाल स्पर्धेत कु.गांगुर्डे पल्लवी प्रकाश, कु. जाधव आरती जगन , कु. बेंडकोळी तनुजा गोपीनाथ,काव्य वाचन स्पर्धेत कु.मिंदे जान्हवी जयराम, कु.कदम प्रेरणा देवेंद्र, कु. मिंदे श्रुती जयराम अणि भाषण या स्पर्धेत कु. मिंदे श्रुती जयराम, कु. मिंदे जान्हवी जयराम, कु. क्षिरसागर दिक्षा कैलास या विद्यार्थ्यांनी क्रमशः प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. हिंदी सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी दीपक देवरे, समता शिंदे, दिव्या कर्डेल, उप प्राचार्य डॉ. शरद कांबळे, सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, डॉ. संदीप निकम,डॉ. अजीत नगरकर, डॉ. भागवत महाले, डॉ. सोनाली पाटील, प्रा.ॠषिकेश गोतरणे, प्रा. श्रीमती अर्चना धारराव ,प्रा. विष्णू दिघे ,प्रा. उत्तम सांगळे, प्रा.आशितोष खाडे, डॉ. संदीप माळी, प्रा.निलेश म्हरसाळे, डॉ. सुलोक्षणा कोळी,प्रा.श्रीमती नीता पुणतांबेकर, प्रा.श्रीमती योगिनी पगारे, प्रा. किरण शिंदे, प्रा.श्रीमती मंजुश्री नेरकर,कार्यालय कर्मचारी रविन्द्र मालुंजकर आदीसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.एस.जे.गांगुर्डे यांनी केले. त्यांनी हिन्दी भाषा दिन साजरा करण्या मागचा उद्देश स्पष्ट करून राष्ट्रभाषा हिंदी विषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिन्द विभागाचे डॉ. पी. बी. बिरारी यांनी केले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०