बिटको महाविद्यालयाचा ओंकार ढेरिंगे यास शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रजत पदक
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 27 नोव्हेंबर 2023
β⇔नाशिकरोड, ता.27 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वी वाणिज्यचा विद्यार्थी ओंकार ढेरिंगे याने बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये २०० मीटर फ्रीस्टाइल या क्रीडा प्रकारामध्ये रजत पदक द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्याच्या या सुयशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांनी अभिनंदन केले . त्याला क्रीडा शिक्षक महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०