





बदलापूर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार शाळेने पोलिसात न दिल्याने शाळेवर “पोस्को”अंतर्गत गुन्हा दाखल

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 23 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.23 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरांमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारा मुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला असून आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, याप्रकरणी न्यायालयाने असे सांगितले की, चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आहे, ही कसली परिस्थिती आहे? शाळेतच मुली सुरक्षित नसतील, शाळा सुरक्षित नसेल, तर इतर गोष्टीवर बोलण्यात काय अर्थ? अशी संतप्त प्रतिक्रिया न्यायालयाने दिली आहे.
ज्यावेळी लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पालकांनी शाळेतील अधिकाऱ्यांना दिली, त्यावेळी शाळेनी सुद्धा याबाबतची तक्रार पोलिसात देणे अनिवार्य होती, परंतु शाळेने मात्र तसे काही केले नाही. उलट हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला. शाळेने ही तक्रार पोलिसात न दिल्याने त्या शाळेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे एखाद्या शाळेवर पोस्को गुन्हा दाखल झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान 12 आणि 13 ऑगस्टला आरोपी अक्षय शिंदे यांनी दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात या प्रकरणी याचिका दखल घेण्यात आली आणि 26 ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली असून 27 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने केलेल्या सुनावणीमध्ये सरकारकडून केस लढणाऱ्या वकिलाला काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्यात मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार शाळा प्रशासनाकडे केली होती का? असा सवाल सरकारकडून केस लढवणाऱ्या वकिलांना करण्यात आला. त्यावर वकिलांनी हो असं उत्तर दिलं. त्यानंतर शाळेने दखल न घेता प्रकरण लपवलं त्या प्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल झाला का ? असा सुद्धा सवाल कोर्टाकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता शाळेवर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने पोलिसांना सवाल करत पालकांनी एफआयआर दाखल केल्यानंतर शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल का केला नाही, याबाबत पोलीस प्रशासनाला चांगलाच फटकार दिला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )