β⇔नाशिक रोड,ता.20(प्रतिनिधी: संजय परमसागर ):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सोमवार, 20 जानेवारी 2025 पासून ‘सीबीसी नाशिकरोड फेस्ट’ या वार्षिक स्नेहसंमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा आणि डेज आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. आज, 20 जानेवारी रोजी मेहंदी, रांगोळी आणि काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्ये परीक्षक, स्पर्धा प्रमुख, समिती सदस्य, प्राध्यापक आणि अन्य विद्यार्थ्यांच्या समोर सादर केली. याशिवाय, ‘सारी डे’, ‘टाय डे’ आणि ‘रोझ डे’ साजरे करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला. सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही स्पर्धा आणि डेज आयोजित केली जात असल्याची माहिती प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, सौ. सुनिता नेमाडे, विद्यार्थि सभा कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मण शेंडगे, प्रा. सुहास माळवे यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक, स्पर्धा प्रमुख, समिती सदस्य आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले. स्नेहसंमेलनाचे हे आयोजन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना एकात्मिक व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने मार्गदर्शन करत आहे.
β : नाशिक रोड:⇔बिटको महाविद्यालयात ‘सीबीसी नाशिकरोड फेस्ट’ वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात प्रारंभ-(प्रतिनिधी: संजय परमसागर )
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )